Railway Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वे प्रवाशांचे बल्ले-बल्ले, आता तिकिटावर मिळणार बंपर डिस्काउंट

Indian Railways Latest News: ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railways Latest News: ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापासून करोडो प्रवाशांना तिकिटांवर सूट मिळणार आहे. याबाबतची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. विभागाकडून ट्रेनमध्ये महिलांना 50 टक्के आणि पुरुषांना 40 टक्के सवलत ज्येष्ठ नागरिक श्रेणीत मिळायची, पण कोरोनामुळे ती बंद झाली होती. परंतु आता नवीन नियमांनुसार रेल्वे कोणाला ट्रेन तिकिटावर सूट देत आहे ते जाणून घेऊया...

सवलत कोणाला मिळते?

रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी केवळ शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी, शहीदांच्या पत्नी, पुरस्कार विजेते आणि वैद्यकीय कारणांसाठी तिकिटे उपलब्ध आहेत. यामध्ये रुग्ण आणि विद्यार्थ्यांना 11 श्रेणींमध्ये आणि दिव्यांगांना 4 श्रेणींमध्ये लाभ मिळतो.

विद्यार्थ्यांना किती सवलत मिळते?

विद्यार्थ्यांना (Students) उपलब्ध असलेल्या सवलतीबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांना स्लीपर क्लासमध्ये 50 टक्के सवलत मिळते. दुसरीकडे, एससी आणि एसटी श्रेणीतील विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तर यांना 75 टक्के सवलत मिळते. त्याचवेळी, UPSC च्या मुख्य परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाते.

गंभीर आजाराच्या बाबतीत किती सूट मिळते?

रेल्वेने सांगितले की, गंभीर आजारांना सामोरे जाणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या तिकिटात सवलत मिळते. थॅलेसेमिया, हृदय आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना स्लीपर, एसी चेअर कार, फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास प्रवाशांना 75 टक्के सवलत मिळते. त्याचवेळी, प्रवाशांना (Passengers) फर्स्ट आणि सेकंड एसी तिकिटांवर 50 टक्के सूट मिळते.

कर्करोगाच्या रुग्णांना किती सवलत मिळते?

याशिवाय कॅन्सरच्या समस्येचा सामना करणाऱ्या प्रवाशांनाही फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. याशिवाय स्लीपर आणि थर्ड एसीची तिकिटे पूर्णपणे मोफत आहेत आणि सेकंड एसीवर 50 टक्के सूटही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT