Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा!

Indian Railways Update: देशातील करोडो प्रवाशांना रेल्वेमंत्र्यांकडून खूशखबर मिळाली आहे. अश्विनी वैष्णव यांनी अशी घोषणा केली आहे, जी ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल.

Manish Jadhav

Indian Railways Update: देशातील करोडो प्रवाशांना रेल्वेमंत्र्यांकडून खूशखबर मिळाली आहे. अश्विनी वैष्णव यांनी अशी घोषणा केली आहे, जी ऐकून तुम्हीही आनंदाने उड्या माराल.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नवी वंदे भारत एक्स्प्रेस दिल्ली, जयपूर आणि अजमेर मार्गावर (दिल्ली-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस) सुरु करण्यात येत आहे.

काही तांत्रिक बदल करण्यात येत आहेत

माहिती देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेन 10 एप्रिलपूर्वी जयपूर मार्गावर चालवली जाऊ शकते. या मार्गावर वंदे भारत धावण्यासाठी काही तांत्रिक बदल करण्यात येत असून, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. सध्याच्या ट्रॅकमध्ये काही बदल केल्यानंतर, वेग लक्षणीय वाढेल.

रेल्वेमंत्री जयपूरला पोहोचले

या ट्रेनच्या संचालनाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी रेल्वेमंत्री स्वत: जयपूरला (Jaipur) पोहोचले आहेत. येथे त्यांनी सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. यासोबतच खातीपुरा स्थानकाचीही पाहणी करण्यात आली आहे. याठिकाणी नवीन इमारतीतील प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांचीही माहिती घेण्यात आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 24 मार्चला जयपूरला पोहोचेल.

प्रवासात वेळ कमी लागेल

दिल्ली (Delhi) आणि जयपूर दरम्यान वंदे भारत चालवल्यामुळे, दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करण्यासाठी खूप कमी वेळ लागेल. ती सुरु झाल्यानंतर दिल्लीहून डेहराडूनला पोहोचण्यासाठी 1 तास 45 मिनिटे लागतील अशी अपेक्षा आहे.

वंदे भारत एक्सप्रेस अनेक मार्गांवर धावत आहे-

>> नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस

>> नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस

>> गांधीनगर आणि मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

>> वंदे भारत नवी दिल्ली ते हिमाचल प्रदेशातील अंब अंदौरा

>> चेन्नई-म्हैसुरु वंदे भारत एक्सप्रेस

>> नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस

>> हावडा-न्यू जलपाईगुडी वंदे भारत एक्सप्रेस

>> सिकंदराबाद-विशाखापट्टणम वंदे भारत एक्सप्रेस

>> मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस

>> मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT