indian railway news will the train fare also become expensive due to increase in diesel prices know what the railway said Dainik Gomantak
अर्थविश्व

रेल्वेच्या स्पष्टीकरणामुळे सर्व अफवांना पूर्णविराम

रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिले स्पष्टीकरण

दैनिक गोमन्तक

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 22 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान देशभरात 14 हप्त्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 10 रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या किमतीतील दरवाढीमुळे इतर वस्तूंच्या महागाईवरही मोठा परिणाम झाला आहे. पण डिझेल महागले तर डिझेलवर चालणाऱ्या ट्रेनच्या तिकीट दरातही वाढ होणार का? रेल्वे डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची तिकिटे महाग करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. यावर आता रेल्वेने (railway) स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वेने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून सांगितले की, त्यांची अशी कोणतीही योजना नाही आणि अहवालात मांडले जाणारे अंदाज निराधार आहेत.

रेल्वेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे डिझेल ट्रॅक्शनवर धावणाऱ्या गाड्यांवर अधिभार लावणार आहे का? सर्व संबंधितांना कळवण्यात येते की भारतीय रेल्वेची अशी कोणतीही योजना नाही. सर्व अनुमान निराधार आहेत.

असा अंदाज वर्तवला जात होता

डिझेल लोकोमोटिव्हवर चालणाऱ्या गाड्यांमधून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जास्त भाडे आकारले जाऊ शकते, असे या अहवालात म्हटले जात होते. डिझेल लोकोमोटिव्हवर धावणाऱ्या गाड्यांची तिकिटे रेल्वे बोर्ड महाग करणार आहेत. हे अतिरिक्त भाडे 15 एप्रिलपासून तिकीट बुकिंगच्या वेळी रेल्वे प्रवासात जोडले जाईल. वृत्तानुसार, हायड्रोकार्बन अधिभार (HCS) किंवा डिझेल कर 10 ते 50 रुपयांदरम्यान लावण्याची चर्चा आहे. आता रेल्वेच्या स्पष्टीकरणाने या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (OIL) किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाची किंमत चार टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 108 डॉलरच्या पुढे पोहोचली. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीत सध्या पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रतिलिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT