Indian Railways Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! तिकीट बुकिंगसह या सेवा राहणार बंद

Indian Railways: जर तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Railways: जर तुम्ही भारतीय रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 26 ते 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेतीन तासांसाठी पीआरएस सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. या काळात अनेक सेवा विस्कळीत राहतील, असे उत्तर रेल्वेने सांगितले आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर आधी ही बातमी वाचा.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेची (Indian Railways) पीआरएस सेवा 26 ते 27 नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेतीन तासांसाठी तात्पुरती बंद राहणार आहे. उत्तर रेल्वेच्या प्रवक्त्याने सोमवारी ही माहिती दिली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन डाटाबेसच्या कामामुळे काही सेवा ठप्प राहतील. या सेवेत व्यत्यय आल्याने, रेल्वे आरक्षण, चार्टिंग, 139 सेवा, काउंटर सेवा, इंटरनेट बुकिंग यासह ईडीआर सेवा काही काळासाठी बंद राहतील. या सर्व सेवा 26 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 ते 27 नोव्हेंबर पहाटे 3.15 वाजेपर्यंत उपलब्ध नसतील.

सेवा बंद का राहतील माहित आहे?

ही घोषणा का करण्यात आली याची माहिती भारतीय रेल्वेने दिली आहे. खरे तर, रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी वेळोवेळी प्रवासी आरक्षण प्रणाली बदलत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रवासी आरक्षण व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले असून, त्यामुळे प्रवाशांची (Passengers) सोय झाली आहे. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी संसदीय समितीला सांगितले होते की, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ पीआरएसच्या विद्यमान प्रणालीवर काम करत आहे. त्यासाठी रेल्वेच्या अपग्रेडेशनच्या सूचना देण्याच्या उद्देशाने सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT