Money Dainik Gomantak
अर्थविश्व

'भारतीय ग्राहक आर्थिक स्थितीबद्दल उत्साहीत, पण...'

देशातील बहुतांश ग्राहक येत्या एक वर्षासाठी त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल उत्साहित आहेत, परंतु त्यांनी वस्तू आणि सेवांच्या (Services) वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

देशातील बहुतांश ग्राहक येत्या एक वर्षासाठी त्यांच्या आर्थिक स्थितीबद्दल उत्साहित आहेत, परंतु त्यांनी वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अर्न्स्ट अँड यंग (EY) या सल्लागार कंपनीने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 'वस्तू आणि सेवांच्या वाढत्या किमतींचा ग्राहकांच्या खरेदी निर्णयावर परिणाम होत आहे.' (Indian consumers are excited about the economic situation but rising inflation is raising concerns)

दरम्यान, EY फ्युचर कन्झ्युमर इंडेक्स फॉर इंडियाच्या नवव्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, '80 टक्क्यांहून अधिक लोक वाढत्या खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या अनिश्चिततेमुळे बचत करत आहेत. या सर्वेक्षणाने भारतीय ग्राहकांच्या (Customers) सकारात्मक दृष्टिकोनाची पुष्टी केली आहे. कारण 77 टक्के लोकांना पुढील एका वर्षात त्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.'

तसेच, हे सर्वेक्षण फेब्रुवारी 2022 मध्ये 1000 हून अधिक भारतीय ग्राहकांच्या आधारावर करण्यात आले. अहवालानुसार, भारतातील बहुतांश ग्राहकांनी वस्तू आणि सेवांच्या (Service) वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

सर्वेक्षणानुसार, ही स्थिती भारतातील सर्वात कमी उत्पन्न असलेल्या लोकांना प्रभावित करते. अशा लोकांची संख्या 72 टक्के आहे. त्यापाठोपाठ उच्च उत्पन्न गटातील 60 टक्के ग्राहक आणि मध्यम उत्पन्न गटातील 58 टक्के ग्राहक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT