India Post recruitment 2023 Dainik Gomantak
अर्थविश्व

India Post Recruitment: पोस्ट खात्यात नोकरीची सुवर्ण संधी, 11 जूनपर्यंत करता येणार अर्ज

भारतीय पोस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती निघाली असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ११ जून आहे.

दैनिक गोमन्तक

India Post Recruitment: भारतीय पोस्ट खात्यात तरुणासाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध जाली आहे. तब्बल 12828 पदांसाठी मेगाभरती करण्यात येत आहे.ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी फक्त दहावी पास असण्याची शैक्षणिक अट घालण्यात आली आहे. यासाठी 22 मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असुन अंतिम तारिख ही 11 जून आहे.

ग्रामीण डाक सेवक पदासाठी 22 मे पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर 11 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

दहावी पास असणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना 18 ते 40 वर्षांपर्यंतची वयोमर्यादेची अट ठेवण्यात आली आहे. दहावीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची लिस्ट तयार करण्यात येणार असून त्यानंतर निवडीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची फायनल लिस्ट जारी करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.

पोस्ट खात्यातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये एवढे शूल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळं शूल्क भरावं लागणार आहे.

गेल्या वर्षीच पोस्ट खात्याने सात हजार ग्रामीण सेवक पदांची भरती केली होती. त्यानंतर आता या महिन्यातही 12 हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येत असल्यामुळे बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

त्यामुळे आता जास्तीत जास्त तरुणांनी पोस्ट खात्यातील नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत भारतीय पोस्ट खात्याकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT