Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2023: मोदीजी तुम्हीच! नव्या अर्थसंकल्पापूर्वीच सरकारने दिलेले आश्वासन केले पूर्ण

Income Tax Rate: नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षात काही नवीन गोष्टी नक्कीच घडणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Income Tax Rate: नवीन वर्ष सुरु झाले आहे. नवीन वर्षात काही नवीन गोष्टी नक्कीच घडणार आहेत. यासोबतच केंद्र सरकारकडून नव्या वर्षात केंद्रीय अर्थसंकल्पही सादर केला जाणार आहे. आता काही आठवड्यांनंतर केंद्र सरकार देशासाठी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र, यादरम्यान केंद्र सरकारने अनेक आश्वासनांची पूर्तताही केली आहे. गेल्या वर्षी सादर केलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने केलेल्या घोषणांची पूर्तताही झाली आहे.

आयकर

आता सरकारने (Government) 2022-23 च्या अर्थसंकल्पात दिलेली आश्वासने पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. या क्रमाने, सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की, 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेला प्रोत्साहन देत, सहकारी संस्थांसाठी पर्यायी किमान कर कमी करण्यात आला असून तो 15% करण्यात आला आहे. याशिवाय, अधिभारही कमी करण्यात आला आहे. अधिभार 12% वरुन 7% करण्यात आला आहे. याचा लाभ हजारो लोकांनी घेतला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प

आयकर विभागाने (Income Tax Department) सहकारी संस्थांसाठी केलेल्या सुधारणांचा अनेकांना फायदा झाला आहे. सहकारी संस्थांना कंपन्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी पर्यायी किमान कर 15% करण्यात आला आहे. दुसरीकडे, सहकारी संस्थांसाठी प्राप्तिकर विभागामार्फत करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त परंतु 10 कोटी रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सहकारी संस्थांसाठी अधिभार 12% वरुन 7% पर्यंत कमी करणे समाविष्ट आहे.

आयकर विभाग

यासह, पालक/पालकांच्या हयातीत अपंग अवलंबितांना वार्षिकी आणि एकरकमी रक्कम दिली जाते, अशा वजावटीला अनुमती देण्यासाठी कलम 80DD मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यासह, अधिभार/उपकराचे स्पष्टीकरण देताना, असे सांगण्यात आले की, करपात्र उत्पन्नाच्या गणनेत वजावट म्हणून अधिभार/उपकर स्वीकार्य नाही. त्यानुसार, करदात्यांना मागील वर्षाच्या उत्पन्नाच्या पुनर्गणनेसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित फॉर्म अधिसूचित करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT