केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट! PF मध्ये होणार वाढ

 

Dainik Gomantak 

अर्थविश्व

केंद्र सरकारची कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट! PF मध्ये होणार वाढ

नवीन कामगार कायद्यानुसार नवीन वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगारापासून (Salary) त्यांच्या सुट्या आणि कामाच्या तासांमध्ये (Working Time) बदल होईल.

दैनिक गोमन्तक

नवीन कामगार कायदे नवीन वर्षात लागू होऊ शकतात. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारापासून (Salary) त्यांच्या सुट्या आणि कामाच्या तासांमध्ये (Working Time) बदल होईल. त्यानुसार आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी असणार आहे. यामध्ये कामाचे तास आठ एवजी 12 असतील. मात्र, आठवड्यातील 48 तास कामाचा नियम लागू राहणार असल्याचेही कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जिथे आठ तास काम केले जी तिथे एक दिवसाची सुट्टी असेल अशी सोय केली आहे. माहिती देताना एका वारिष्ट अधिकाऱ्याने सांगितले की, या कायद्यासाठी किमान 13 राज्यांनी मसुदा तयार केला आहे. नवी कामगार दलात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्याचा परिणाम कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते गिरण्या आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारापर्यंत होईल.

* केंद्राने अंतिम निर्णय दिले

मंजूरी (Approval) , सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीवर चार कामगार संहिता पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे. केंद्राने या संहिता अंतर्गत नियमांना (Rules) अंतिम रूप दिले आहे. आता राज्यांना (State) त्यांचे स्वत:चे नियम बनवावे लागतील, कारण श्रम हा समवर्ती यादीतील विषय आहे. पुढील आर्थिक वर्षात चार कामगार संहिता लागू होण्याची शक्यता आहे,असे अधिकाऱ्याने सांगितले.

मोठ्या संख्येने राज्यांनी त्यांचे मसुदा नियमांना अंतिम रूप दिले आहे, असे ते म्हणाले. केंद्राने (Central Government) फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितासाठी मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्याने, केंद्राने राज्यांनी एकाच वेळी त्यांची अँमलबजावणी करावी असे वाटते.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, किमान 13 राज्यांनी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य कामाच्या परिस्थितीवर कामगार संहितेचा मसुदा तयार केला आहे. याशिवाय 24 राज्ये आणि केंद्रशातीत प्रदेशांनी मंजूरीवरील कामगार संहितेचा मसुदा तयार केला आहे. औद्योगिक संबंध संहितेचे मसुदा नियम 20 राज्यांनी तयार केले आहे आणि सामाजिक सुरक्षा संहितेचा मसुदा नियम 18 राज्यांनी तयार केले आहे.

* पगार कमी तर पीएफ जास्त मिळेल

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि भविष्य निर्वाह निधी मोजण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. यामुळे एकीकडे कर्मचाऱ्यांचे पीएफ खत्यातील योगदान दरमहा वाढेल पण हातात असलेला पगार कमी होणार आहे. नवीन कामगार संहितेत, भत्ते 50 टक्यांवर मर्यादित करण्यात आले आहेत. यामुळे मूळ वेतन कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या 50 टक्के होईल.

पीएफची गणना मुळ वेतनाच्या (Salary) टक्केवारीच्या आधारावार केली जाते मूळ वेतन आणि महागाई भत्ता समाविष्ट असतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे वेतन दरमहा 50 हजार रुपये असेल् तर त्याचे मूळ वेतन 25 हजार रुपये आणि उर्वरित 25 हजार रुपयांमध्ये भत्यांचा समावेश असेल. मूळ वेतनात (Salary) वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने पीएफ (PF) अधिक कापला जाईल आणि कंपनीचे योगदानही वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT