Credit Card वापरताय, मग ही बातमी वाचाच Dainik Gomantak
अर्थविश्व

Credit Card वापरताय, मग ही बातमी वाचाच

जर तुम्ही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर या तीन चुका करणे टाळावे.

दैनिक गोमन्तक

सध्याच्या डिजिटल (Digital) युगात क्रेडिट कार्डचा वापर अधिक वाढला आहे. हे एक मोठी गोष्ट आहे. पण ते योग्यरित्या वापरले गेले, तर तुम्हाला कोणत्याही खरेदीवर पेमेंट (Payment) करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा व्याजमुक्त वेळ मिळेल. तुम्हीही क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

प्रत्येक क्रेडिट कार्डला (Credit Card) मर्यादा असते. याशिवाय बिंलिग तारीख आहे आणि त्यानंतर सुमारे 20 दिवसांनी पैसे भरण्याची देय तारीख आहे. देय तारखेपूर्वी बिल भरले तर चांगली गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची (Credit Card मर्यादेच्या फक्त 30 टक्के वापर केला आणि वेळेवर पेमेंट (Payment) केले तर तुमचा सीबील स्कोर मजबूत होतो. जर तुम्ही दर महिन्याला 30 टक्क्याहून अधिक क्रेडिट लिमिट (Credit Limit) वापरत असाल आणि वेळेवर पेमेंट (Payment) देखील करत असाल तर ही स्थिति चांगली नाही. सोप्या शब्दात समजून घ्या की कार्डचे मासिक बिल क्रेडिट कार्डच्या (Credit Card) मर्यादेच्या 30 टक्के इतके मर्यादित आसवे.

* रोख रक्कम काढणे टाळा

क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करून पैसे काढण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. पण, अशी चूक कधीही करू नका. रोख पैसे काढण्यासाठी कोणताही व्याजमुक्त कालावधी नाही. याशिवाय तुम्हाला अनेक अतिरिक्त शूल्कही जमा करावे लागतील. एचडिएफसी (HDFC)बँ केच्या वेबसाइटनुसार, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डमधून (Credit Card) पैसे काढता तेव्हा 2.5 ते 3 टक्के रोख आगाऊ शुल्क जमा करावे लागते. आगाऊ शूल्कही किमान 250 ते 500 रुपये पर्यंत असू शकते. तुम्ही रोख पैसे (Money) काढता त्या दिवसापासून व्याज सुरू होते. पूर्ण परतफेड होईपर्यंत हे चालू राहते. याशिवाय 2.5 ते 3.5 टक्के व्याज दरमहा जमा करावे लागेल. याशिवाय रोख रक्कम काढल्याने तुमचा क्रेडिट स्कोअरही (Credit score) कमकुवत होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Rakhi 2025 Lucky Colors: रक्षाबंधन विशेष, राशीनुसार कपड्यांचे आणि राखीचे कोणते रंग शुभ आहेत? जाणून घ्या

Nagpanchami 2025: संपूर्ण गोव्यात नागपंचमी उत्साहात साजरी

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

SCROLL FOR NEXT