Mutual funds Dainik Gomantak
अर्थविश्व

Mutual funds: तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर 'ही' बातमी वाचा

जर तुम्ही म्युचल फंडमध्ये गुंतवणूक कराल तर यात तुमचे पैसे गमावण्याची रिस्क कमी असते

गोमन्तक डिजिटल टीम

म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने शेअर बाजारात गुंतवणूक केल्या जाते. जर तुम्हाला मोठा परतावा पाहिजे असेल तर हे फंड तुम्हाला तो देऊ शकतात. जर तुम्ही म्युचल फंडमध्ये गुंतवणूक कराल तर यात तुमचे पैसे गमावण्याची रिस्क कमी असते आणि नफा पण शेअर बाजाराच्या तुलनेत कमी असतो. शेअर बाजार मधील पैसा हा एकाच कंपनीमध्ये गुंतवला जातो तर म्युचल फंड मध्ये फंड मॅनेजर हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे थोडे पैसे लावतो. 

म्युच्युअल फंडचा पैसा हा फक्त कोणत्याही एकाच ठिकाणी न गुंतवता वेगवेगळ्या कंपन्या मध्ये गुंतवला जाता. ज्यामुळे पैसा गमावण्याची शक्यता कमीच असते. कारण जर कोणत्याही एका कंपनी ला नुकसान झाले तरीही बाकीच्या कंपन्या त्या काळात विकास करीत राहतात व त्यामुळे जास्तीचे नुकसान होण्याचा धोका टळतो.

म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे काढायचे असल्यास आता ते तीन दिवसांच्या आत गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश भांडवली बाजार नियंत्रक असलेल्या सेबीने जारी केले आहेत. आतापर्यंत आपल्या खात्यातील पैसे काढल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी गुंतवणूकदारांना १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र आता तो कालावधी कमी करण्यात आला आहे.

आतापर्यंत आपल्या खात्यातील पैसे काढल्यानंतर ते खात्यात जमा होण्यासाठी गुंतवणूकदारांना १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागत होती. तो कालावधी आता सात दिवसांनी कमी करत तीन दिवसांवर आणण्यात आला आहे. तसेच, म्युच्युअल फंडातील योजनेतर्फे जो बोनस दिला जातो, तो देखील गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये अथवा पुनर्गुंतवणुकीमध्ये करण्याची कार्यवाही सात दिवसांत करावी, असेही सेबीने स्पष्ट केले आहे. यापूर्वी बोनस जमा होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT