ICICI Bank's Net Profit  Dainik Gomantak
अर्थविश्व

ICICI बँकेच्या निव्वळ नफ्यात वाढ; 59 टक्क्यांनी वाढून 7 कोटींवर झेप

ICICI Bank's Net Profit : खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

ICICI Bank's Net Profit : खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने आज चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत बँकेच्या निव्वळ नफ्यात 59 टक्के वाढ झाली आहे. बँकेचा नफा 7,019 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेने शनिवारी याबाबत माहिती दिली.

मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत बँकेला 4,403 कोटी रुपयांचा नफा झाला होता. ICICI बँकेने सांगितले की, जानेवारी-मार्च 2022 या कालावधीत त्यांचे एकूण उत्पन्न 27,412 कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे मागील वर्षी याच कालावधीत 23,953 कोटी रुपये होते. (ICICI Bank's net profit rose 59 per cent to Rs 7 crore)

व्याजातून मिळणारे उत्पन्न 21 टक्क्यांनी वाढले

याशिवाय व्याजाचे उत्पन्नही 21 टक्क्यांनी वाढून 12,605 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे एका वर्षापूर्वीच्या 10,431 कोटी रुपये होते. एकत्रित आधारावर, 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 58 टक्क्यांनी वाढून 7,719 कोटी रुपये झाला आहे.

बँकेचा NPA किती होता?

2020-21 च्या याच कालावधीत ते 4,886 कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीत बँकेच्या मालमत्तेचा दर्जाही सुधारला आहे. मार्च 2022 पर्यंत बँकेची ग्रॉस नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPA) 3.60 टक्क्यांपर्यंत घसरली. एका वर्षापूर्वी ते एकूण नफ्याच्या 4.96 टक्के होते. या काळात बँकेचा निव्वळ एनपीएही 1.14 टक्क्यांवरून 0.76 टक्क्यांवर घसरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT