Live Location Dainik Gomantak
अर्थविश्व

Live Location: फोन नंबरवरून एखाद्याचे लाईव्ह लोकेशन शोधण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

एखाद्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचे अनेक ट्रिक असले तरी, केवळ मोबाईल नंबरने शोध घेणे अशक्य आहे.

दैनिक गोमन्तक

लोकेशन ट्रॅकिंगचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या टर्मचा वापर एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी केला जातो. अनेक लोक कोणाच्या तरी फोन नंबरवरून त्यांचे लोकेशन जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या व्यक्तीचे लोकेशन शोधण्याचे अनेक ट्रिक असले तरी, केवळ मोबाईल नंबरने शोध घेणे अशक्य आहे.

युर्जच्या संमतीशिवाय त्याचे लोकेशन जाणून घेणे अशक्य आहे. काही युर्जसची माहिती निश्चितपणे काढली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही प्रदेश, नाव आणि युर्जसचे टेलिकॉम ऑपरेटर यासारखे डिटेल्स माहिती करू शकतात. पण लाइव्ह लोकेशन जाणून घेणे सामान्य माणसासाठी शक्य नाही.

अनेक लोक यासाठी गुगलवर (Google) 'अनेक ट्रिक्स' सर्च करत राहतात. असे करतांना त्यांचा स्वतःचाच डेटा चोरीला जातो. प्रत्येक प्रश्न आणि समस्येवर उपाय शोधण्यासाठी अनेक लोक गुगलचा वापर करतात.

अशा अनेक वेबसाइट्स देखील दिसतील, ज्या तुम्हाला मोबाइल (Mobile) नंबरच्या मदतीने वापरकर्त्याचे स्थान सांगण्यास मदत करतील. या सगळ्यावर तुम्हाला युजरचे लोकेशन मिळणार नाही, पण तुमचा डेटा नक्कीच चोरीला जाईल.

* लोकेशन ट्रॅकिंगचा कोणताही मार्ग नाही असे नाही. एक मार्ग आहे, परंतु प्रत्येकाला ते वापरता येत नाही. पोलिस आणि इतर सरकारी यंत्रणाच फक्त याचा वापरत करू शकतात.

* यासाठी पोलिसांना टेलिकॉम कंपनीची मदत घ्यावी लागते. ऑर्डर मिळाल्यानंतर, टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्याचा नंबर ट्रेसिंगवर ठेवतात आणि सक्रिय नंबरचे लोकेशन पोलिसांना देतात.

इतर मार्ग

तुम्ही ट्रू कॉलर (True Caller) सारख्या प्लॅटफॉर्मवर नंबर शोधू शकता. यामध्ये तुम्हाला युजरचे लोकेशन मिळणार नाही, पण त्याच्या नावाची आणि गावाची माहिती नक्कीच मिळू शकते.

कधी कधी तुम्हाला यूजरचे नाव देखिल मिळत नाही. जर तो नंबर Truecaller च्या निर्देशिकेत नसेल तर तुम्हाला वापरकर्त्याचे नाव दिसणार नाही. अनेक लोक चुकीच्या नाव रजिस्टर करतात.

याशिवाय यूजर स्वतःचे लोकेशन देखील शेअर करू शकतो. यासाठी व्हॉट्सअॅप आणि इतर अॅप्सचा वापर केला जातो. तुम्ही गुगल मॅपच्या (Google Map) मदतीने वापरकर्त्याला त्याचे लाइव्ह लोकेशन देखील विचारू शकता. लक्षात ठेवा की आपण या मार्गांनी वापरकर्त्याच्या संमतीशिवाय वापरकर्त्याचे थेट स्थान मिळवू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT