EPFO Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Withdraw Rule: पीएफ सदस्य दुसऱ्यांदा काढू शकतात कोविड अ‍ॅडव्हान्स

ऑनलाइनद्वारे दुसऱ्यांदा कोविड अ‍ॅडव्हान्स काढण्यासाठी जाणून घ्या सोपी पद्धत

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना विषाणुने थैमान घातले आहेत. यामुळे अनेक नोकरदारांना पुन्हा आर्थिक संकटांतून जावे लागू शकते. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटे दरम्यान पीएफ खातेधारकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी दुसऱ्या नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्सचा लाभ आपल्या सदस्यांना वाढवला आहे.

यापूर्वी, महामारीच्या काळात नोकरदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत मार्च 2020 मध्ये विशेष पैसे काढण्याची तरतूद करण्यात आली होती. या नियमानुसार, इपीएफओ (EPFO) कर्मचारी त्यांच्या खात्यातून तीन महिन्यांचा मूळ पगार आणि डीएचे पैसे काढू शकतात. याशिवाय इपीएफ (EPF) खात्यातील 75 टक्के रक्कम, यापैकी जी कमी असेल ती काढता येते. हे पैसे (Money) काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हालाही पीएफ खात्यातून दुसऱ्यांदा पैसे काढायचे असतील, तर जाणून घ्या काय आहे प्रकिया.

* पैसे काढण्यासाठी ऑनलाइनद्वारे नोंदणी कसे करावे

* सर्व प्रथम इपीएफओ च्या युनिफाईड वेबसाईट https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर लॉगइन करावे.

* यानंतर तुमचा युएएन , पासवॉर्ड टाकावे.

* यानंतर ऑनलाइन सेवा पर्यायावर जाऊन (फॉर्म- 31, 19, 10 C, 10D) वर क्लिक करावे.

* नंतर तुमच्या स्क्रीनवर नाव, जन्मतारीख आणि तुमचा आधार कार्ड क्रमांक यासारखी सर्व माहिती भरावी. त्यानंतर एक वेबपेज उघडेल.

* येथे तुम्ही तुमचा बँक खाते क्रमांक टाका आणि नंतर व्हेरीफिकेशन वर क्लिक करावे.

* यानंतर Proceed for online claim वर क्लिक करावे.

* यानंतर पुढे PF Advance फॉर्म वर क्लिक करावे.

* पुढे कोविड-19 पैसे काढण्याच्या पर्यायावर क्लिक करावे.

* यानंतर मोबाइल नंबर आणि OTPमिळेल, तो सबमिट करावे.

* तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफार केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT