PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Collection Rises: जीएसटी कलेक्शनने केला रेकॉर्ड, PM मोदी म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी...'

April GST Collections: एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Manish Jadhav

GST Collection Rises to Rs 1.87 Lakh Crore in April: एप्रिलमध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

एकाच महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक GST महसूल आहे. जुलै 2017 मध्ये GST लागू झाल्यानंतर, सर्वात जास्त कर संकलनाचा मागील विक्रम 1.68 लाख कोटी रुपये होता, तो गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बनला होता.

आतापर्यंतचे सर्वाधिक GST संकलन

पीएम मोदींच्या वतीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (Economy) मोठी बातमी. कराचा दर कमी असूनही, कर संकलनात झालेली वाढ जीएसटीचे यश दर्शवते. हे GST ने एकीकरण आणि अनुपालन कसे वाढवले ​​आहे, हे स्पष्ट करते.'

दुसरीकडे, एप्रिल 2023 साठी कर संकलनाचे आकडे जाहीर करताना, वित्त मंत्रालयाने सांगितले की, गेल्या महिन्यात एकूण GST संकलन 1,87,035 कोटी रुपये होते.

यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 38,440 कोटी रुपये, राज्य जीएसटी (SGST) 47,412 कोटी रुपये आणि एकात्मिक जीएसटी (IGST) 89,158 कोटी रुपये होते.

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे

जीएसटी संकलनाच्या आकड्यांमध्ये 12,025 कोटी रुपयांचा उपकर (आयातित वस्तूंवर प्राप्त झालेल्या 901 कोटी रुपयांसह) देखील समाविष्ट आहे.

मंत्रालयाने सांगितले की, 'एप्रिल 2023 मधील जीएसटी संकलन एक वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे.'

तसेच, या कालावधीत देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) कर महसूल एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 16 टक्के अधिक आहे.

2022-23 या आर्थिक वर्षात जीएसटीचे एकूण संकलन 18.10 लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT