GST  Dainik Gomantak
अर्थविश्व

GST Collections: मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक GST कलेक्शन, 5 व्यांदा गाठला 'हा' टप्पा

GST Collections: मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 1,57,090 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Manish Jadhav

GST Collections: मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढून 1,57,090 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मे 2023 मध्ये एकूण संकलन 1,57,090 कोटी रुपये आहे.

यामध्ये CGST संकलन 28411 कोटी रुपये, SGST संकलन 35828 कोटी रुपये आणि IGST संकलन 81363 कोटी रुपये आहे. मे महिन्यात, सरकारने इंटिग्रेटेड जीएसटीमधून सेंट्रल जीएसटीमध्ये 35,369 कोटी रुपये आणि स्टेट जीएसटीमध्ये 29,769 कोटी रुपये सेटल केले.

दरम्यान, जीएसटी (GST) लागू झाल्यापासून मे महिन्यात पाचव्यांदा 1.57 लाख कोटीचा आकडा पार केला. मात्र, ही रक्कम एप्रिलच्या संकलनापेक्षा कमी आहे. एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 12 टक्क्यांनी वाढून वार्षिक आधारावर 1.87 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. एकाच महिन्यात जमा झालेला हा सर्वाधिक जीएसटी आहे.

त्याचवेळी, मे महिन्यात, सरकारने (Government) सलग 14 व्या महिन्यात 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मासिक जीएसटी संकलन केले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात जीएसटीचे एकूण संकलन 18.10 लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 22 टक्के अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT