Amazon Super Value Days Sale Dainik Gomantak
अर्थविश्व

Amazonच्या सुपर वॅल्यू सेलमध्ये 1 रुपयांत मिळणार किराणा; जाणून घ्या ऑफर्स!

Amazon Super Value Days सेल 1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत चालेल.

दैनिक गोमन्तक

Amazon Super Value Days Sale : अॅमेझॉनने सुपर व्हॅल्यू डे सेलची घोषणा केली आहे. Amazon Super Value Days सेल 1 एप्रिल ते 7 एप्रिल पर्यंत चालेल. यामध्ये कंपनी प्राइम मेंबर्सना 1 रुपयात किराणा सामान देत आहे. दावत, हिमालय, सनफिस्ट, डाबर, कॅडबरी, केलॉग, मदर डेअरी यांसारख्या लोकप्रिय ब्रँडवरही ग्राहकांना ऑफर (Offer) दिल्या जात आहेत. (Grocery for Rs 1 at Amazon's Super Value Sale; Find out the offers!)

Amazon सुपर वॅल्यू सेलमध्ये, ग्राहकांना 1 ते 3 एप्रिल दरम्यान SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI सोबत अतिरिक्त 10% सूट दिली जाईल. ही अतिरिक्त सवलत 4 ते 7 एप्रिल 2022 पर्यंत ICICI क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना दिली जाईल. कार्ड सवलतीसाठी किमान व्यवहाराची आवश्यकता रु 2,500 आहे. यामध्ये 300 रुपयांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या सेलमध्ये 50 रुपयांत डीलही दिली जात आहे. खास गोष्ट म्हणजे ग्राहक 500 ग्रॅम बटाटा फक्त 1 रुपयात खरेदी करू शकतात.

याशिवाय अर्धा किलो कांदाही केवळ 1 रुपयाला सेलमध्ये विकला जात आहे. बटाटे आणि कांद्याव्यतिरिक्त बासमती तांदळावरही सवलत दिली जात आहे. 5Kg - दावत डेली सुपर बासमती तांदूळ Amazon Fresh वर अंदाजे रु. 335 मध्ये उपलब्ध आहे.

या सेलमध्ये सनफिस्ट डार्क फँटसी चोको फिल्स आणि टाटा टी गोल्डवर बंपर डिस्काउंट देखील आहेत. मॅगीही स्वस्तात विकली जात आहे. मॅगी 2-मिनिट नूडल्स मसाला, 70 ग्रॅम (12 चा पॅक) Amazon Fresh वर अंदाजे रु. 138 मध्ये विकला जात आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त घरगुती आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांवरही सूट दिली जात आहे. यामध्ये तुम्ही बॉडी वॉश, हँड वॉश, फ्लोर क्लीनर अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलचा लाभ घेण्यासाठी अॅमेझॉन अॅपला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: बाहेरच्या लोकांमुळे 'सुशेगाद' गोव्याची शांतता भंग! गोमंतकीयांना RG-गोवा फॉरवर्डच्या युतीत दिसतोय 'आशेचा किरण'

Senior T20 cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Politics: खरी कुजबुज, मिकीचा 'सोशल ॲक्‍टिविस्‍ट'शी पंगा

सिलिंग फॅन तुटून विद्यार्थीनीच्या अंगावर पडला, पर्ये – सत्तरी सरकारी शाळेतील चौथीची विद्यार्थीनी जखमी

Goa Live News: साखळी नगरपालिकेवर सौरऊर्जा प्रकल्प; पालिकेला मिळणार 30 केव्ही वीज

SCROLL FOR NEXT