Adani Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Wilmar Shares: मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी

अदानी समूहाची एक FMCG कंपनी, Adani Wilmar आहे, ज्याचा बहुप्रतिक्षित IPO आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी उघडला आहे, ज्यावर 31 जानेवारीपर्यंत बोली लावता येईल.

दैनिक गोमन्तक

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची आणखी एक कंपनी शेअर (Adani Wilmar Share) बाजारात उतरत आहे. अदानी समूहाची एक FMCG कंपनी, Adani Wilmar आहे, ज्याचा बहुप्रतिक्षित IPO आज म्हणजेच 27 जानेवारी रोजी उघडला आहे, ज्यावर 31 जानेवारीपर्यंत बोली लावता येईल. यासाठी प्राइस बँड 218-230 रुपये ठेवण्यात आला आहे.

कंपनीचा इश्यू पूर्णपणे फ्रेश शेअर आहे म्हणजेच इश्यूमधून उभारलेले सर्व पैसे कंपनीकडे जातील. अदानी विल्मरचा इश्यू 31 जानेवारीला बंद होणार आहे. अदानी विल्मर यांनी सांगितले की, आयपीओच्या उत्पन्नापैकी 1,900 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी वापरले जातील, तसेच कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी सुमारे 1,058.9 कोटी रुपये वापरले जातील आणि उर्वरित 450 कोटी रुपये धोरणात्मक अधिग्रहण आणि इतर गुंतवणूक संधींवर खर्च केले जातील.

अदानी विल्‍मार हा गौतम अदानीच्‍या (Gautam Adani) मालकीचा अदानी ग्रुप आणि सिंगापूरच्‍या (Singapore) विल्‍मार ग्रुपमध्‍ये 50:50 चा जॉइंट व्हेंचर आहे. कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकते. खाद्यतेलाशिवाय कंपनी तांदूळ, मैदा आणि साखरेचीही विक्री करते. याशिवाय कंपनी साबण, हँडवॉश आणि सॅनिटायझर यासारख्या उत्पादनांचीही विक्री करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT