Government will give good news to farmers next month Dainik Gomantak
अर्थविश्व

डिसेंबर महिन्यात मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट मात्र...

सरकार (Government) पुढील महिन्यात देशातील सर्व शेतकऱ्यांना (farmers) आनंदाची बातमी देणार आहे.

दैनिक गोमन्तक

सरकार (Government) पुढील महिन्यात देशातील सर्व शेतकऱ्यांना (farmers) आनंदाची बातमी देणार आहे. किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 15 डिसेंबरला दहावा हप्ता जमा होणार आहे. मोदी सरकार नोंदणीकृत बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.

मात्र, काही वेळा काही छोट्या चुकांमुळे शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत. तुम्हीही या चुका वेळीच सुधारा. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैसे हस्तांतरित करण्यात आले होते. सरकारने आतापर्यंत देशातील 11.37 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 1.58 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे.

काय योजना आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) मोदी सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लक्षात घेऊन सुरू केली होती. याअंतर्गत शासनाकडून शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत नऊ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले आहेत.

या चुका दुरुस्त करा

  • शेतकरी बांधवांनी त्यांची नावे इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे. हिंदी मध्ये नाव लिहिलं असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा.

  • योजनेसाठी अर्ज करताना अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये कोणतीही चूक असता कामा नये.

  • बँकेचा IFSC कोड अचूक भरलेला असावा.

  • बँक खाते क्रमांक भरताना कोणतीही चूक करू नये.

  • तुमचा पत्ता नीट तपासा, गावाचे स्पेलिंगही चुकीचे असेल तर पैसे येणार नाहीत.

  • या सर्व चुका आधारद्वारे दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुमचे 2,000 रुपये अडकले जातील.

अशा प्रकारे आपल्या चुका सुधारा

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला वरच्या बाजूला Formers Corner ही लिंक दिसेल. लिंकवर क्लिक करून, तुम्हाला आधार संपादनाची लिंक शोधून त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही उघडलेल्या पेजवर तुमचा आधार क्रमांक दुरुस्त करू शकता. दुसरीकडे, जर खाते क्रमांक चुकीचा प्रविष्ट केला असेल, तर तुम्ही तो दुरुस्त देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी किंवा लेखपालशी संपर्क साधावा लागेल. तिथे जाऊन तुम्ही त्याची चूक सुधारू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT