PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

Farmer Subsidy: वाह, मोदीजी वाह! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने केली अनुदानाची घोषणा

Farmer Scheme: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होतो.

Manish Jadhav

Governments Farmer Scheme: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पावले उचलल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होतो.

त्याचवेळी, मोदी सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल उचलले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

आता मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सबसिडी जाहीर केली असून, त्याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे.

शासन अनुदान देईल

खरीप हंगामात शेतकर्‍यांना सध्याच्या किमतीवर मातीतील पोषक तत्वांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार खत अनुदानावर एकूण 1.08 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. खते आणि रसायन मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ही माहिती दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरीप हंगाम 2023-24 साठी शेतकऱ्यांना फॉस्फेट आणि पोटॅश खतांवर 38,000 कोटी रुपयांची सबसिडी (Subsidy) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

खरीप हंगाम

अशाप्रकारे, खरीप हंगामासाठी सरकारचा (Government) एकूण अनुदान खर्च 1.08 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. याआधी अर्थसंकल्पात युरियावर 70,000 कोटी रुपयांची सबसिडी जाहीर करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळात घेतलेल्या या निर्णयाची माहिती देताना मांडविया म्हणाले की, एप्रिल 2023 मार्च 2024 या खरीप हंगामात खत अनुदानावर एकूण 1.08 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.

करोडो शेतकऱ्यांना फायदा झाला

त्याचबरोबर, खतांच्या कमाल किरकोळ किमतींमध्ये (MRP) या काळात कोणताही बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या युरियाचा भाव 276 रुपये प्रति पोती आहे, तर डीएपी 1,350 रुपये प्रति पोती विकला जात आहे. सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांना खत अनुदानाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT