Currency
Currency  Dainik Gomantak
अर्थविश्व

Currency News: 500 अन्1000 रुपयांच्या नोटांनंतर आणखी एक नोट बंद, सरकारचा मोठा निर्णय!

Manish Jadhav

Currency News Update: देशभरात नोटाबंदीच्या बातम्यांनंतर करन्सीसंबंधीच्या बातम्या वेगाने पसरत आहेत. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या, मात्र आता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांनंतर आणखी एक नोट बंद करण्यात आली आहे.

सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांनंतर सरकारने कोणती नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ते जाणून घ्या...

2016 मध्ये नोटाबंदी झाली

2016 मध्ये देशभरात नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती, ज्यामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सरकारने (Government) पुन्हा 500 रुपयांच्या नव्या नोटा छापून बाजारात आणल्या. सध्या बाजारात 500 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. त्याचवेळी, 1000 रुपयांच्या नोटा अजूनही चलनातून बाहेर आहेत.

9 वर्षात नोट बंद झाली

सरकारने यापूर्वीही नोटा चलनातून बाद केल्या आहेत. आज आपण त्या नोटेबद्दल बोलत आहोत, जी पहिल्यांदा 1938 मध्ये छापण्यात आली होती, परंतु तिचा प्रवास फार काळ टिकला नाही आणि अवघ्या 9 वर्षांत ती बंद झाली.

त्यानंतर ती पुन्हा व्यवहारात आणण्यात आली. जेव्हा ही नोट पुन्हा बाजारात आली तेव्हा भारत (India) हा स्वतंत्र देश होता आणि वर्ष होते 1954. यावेळी, ही नोट बराच काळ चलनात राहिली. जेव्हा ही नोट पुन्हा बंद झाली. ही नोट 10000 रुपयांची होती.

देशात सध्या कोणत्या नोटा चलनात आहेत?

देशात सध्या चलनात असलेल्या 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा आहेत. RBI कायदा, 1934 च्या कलम 24 नुसार, RBI ला 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2000, 5000, 10000 रुपयांच्या नोटा छापण्याचा अधिकार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richest Candidate Pallavi Dempo: पल्लवी धेंपे तिसऱ्या टप्प्यात देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार

Goa Today's Live News: भाजपला सत्तेतून हटविण्याची वेळ आलीय - मिकी पाशेको

Harmal News : डबल इंजीन सरकारमुळेच विकास : दयानंद सोपटे

Lok Sabha Elections 2024: वोट फॉर काँग्रेस; दिल्लीत यासिन मलिकसोबत मनमोहन सिंग यांचे पोस्टर कोणी लावले?

सोनीनं लॉन्च केलं फ्युचरिस्टिक 'वेअरेबल एअर कंडिशनर' गॅझेट! जाणून काय आहे खासियत

SCROLL FOR NEXT