Gold Rate Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Rate: सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ, 24 कॅरेट सोने पोहोचले 1 लाख जवळ; चांदीनेही गाठला नवा उच्चांक

Gold Rate April 2025: एकीकडे शेअर बाजार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (21 एप्रिल) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 97 हजारांच्या जवळ पोहोचला.

Manish Jadhav

एकीकडे शेअर बाजार शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी (21 एप्रिल) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 97 हजारांच्या जवळ पोहोचला. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम सुमारे 6,200 रुपयांची वाढ झाली. तज्ज्ञांच्या मते, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे भाव 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. दुसरीकडे, डॉलर निर्देशांकात सातत्याने होणारी घसरण आणि चीन आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.

गोल्डचा विक्रम

दरम्यान, सोमवारी एमसीएक्सवर जून महिन्यातील सोन्याचा (Gold) वायदा 1,621 रुपयांनी वाढून 96,875 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. तथापि, दुपारी 3:05 वाजता, सोन्याचा भाव 1524 रुपयांच्या वाढीसह 96,778 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​व्यवहार करत होता. दुसरीकडे, चांदीचा भाव 642 रुपयांच्या वाढीसह 95,679 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. तर चांदीनेही दिवसात व्यापार सत्रादरम्यान 96,100 रुपयांचा उच्चांक गाठला. गेल्या आठवड्यात, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्चितता आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत बरीच अस्थिरता होती. आठवड्यात सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठला आणि चांदीमध्येही तेजी दिसून आली.

एका महिन्यात किती वाढ?

चालू महिन्याबद्दल बोलायचे झाल्यास, सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 90,717 रुपये होता, जो 96,875 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. याचा अर्थ सोन्याच्या किमतीत 6,158 रुपयांची वाढ झाली. या काळात सोन्याने गुंतवणूकदारांना (Investors) सुमारे 7 टक्के नफा मिळवून दिला. तज्ज्ञांच्या मते, अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याची किंमत एक लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी

सोन्याच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. जागतिक अनिश्चितता आणि चलन बाजारातील अस्थिरता यादरम्यान सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने हा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे, असे तज्ञांचे मत आहे. अक्षय्य तृतीयेसारख्या सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किमती आणखी वाढू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT