Gold Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold Rate: सोन्याच्या किमतीत सलग पाचव्या दिवशी वाढ, दर वाचून चुकेल तुमच्या काळजाचा ठोका; नवा रेकॉर्ड नोंदवला

Gold Rate: देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी पुन्हा रेकॉर्ड केला. मंगळवारी (4 फेब्रुवारी) सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली.

Manish Jadhav

Gold Rate: देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमतींनी पुन्हा रेकॉर्ड केला. मंगळवारी (4 फेब्रुवारी) सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. सोन्याचा भाव आता 86 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. विशेष म्हणजे, चालू वर्षात दिल्लीत सोन्याच्या किमतीत 8 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. दुसरीकडे, देशातील वायदा बाजारात सोन्याचे भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी, चांदीच्या किमतीत सुमारे 300 रुपयांची वाढ नोंदवली गेली.

दिल्लीत सोन्याच्या किमतीचा भडका!

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, मंगळवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) सलग पाचव्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली. सोन्याच्या किमतीत तब्बल 500 रुपयांची वाढ दिसून आली. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 85,800 रुपये या नव्या उच्चांकावर पोहोचला. मागील सत्रात, 99.9 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 85,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. या सत्रात सोन्याचा भाव 6,410 रुपये किंवा 8.07 टक्क्यांनी वाढून 85,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, जो 1 जानेवारी रोजी 79,390 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मंगळवारी 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव सलग पाचव्या सत्रात वाढला आणि तो 500 रुपयांनी वाढून 85,400 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तथापि, चांदीच्या किमतींनी त्यांचा पाच दिवसांचा वाढीचा सिलसिला खंडित केला. सोमवारी 96,000 रुपये प्रति किलोच्या बंद पातळीवरुन 500 रुपयांनी घसरुन 95,500 रुपये प्रति किलोवर आला.

तज्ञ काय सांगतायेत?

डॉलर निर्देशांकात घसरण आणि अमेरिकेतील (America) ग्राहक डेटा प्रिंटमुळे एमसीएक्सवर सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला. अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजच्या कमोडिटीजच्या संशोधन विश्लेषक देव्या गगलानी यांनी सांगितले की, शेअर बाजारातील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित क्षेत्रात गुंतवणूक केली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, बुधवारी सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे मुख्य कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अपेक्षित टॅरिफ योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT