Gold-Silver Price  Dainik Gomantak
अर्थविश्व

Gold-Silver Price : दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात घट

Gold-Silver Price : सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत आहे.

दैनिक गोमन्तक

सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घट होत आहे. आज सोन्याचा भावही स्वस्त झाला आहे. तर चांदीच्या दरातही घट झाली आहे. म्हणजेच आज सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 4,778 रुपये आहे. तर कालचा भाव 4,833 रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या भावात 55 रुपयांनी घट झाली आहे.

(Gold and Silver Price today 12 october 2022)

24 कॅरेट सोन्याच्या दरातही घट

भोपाळ-इंदूर सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचा 8 ग्रॅमचा भाव 38,224 रुपये आहे, तर कालचा भाव 38,664 रुपये होता, म्हणजेच 440 रुपयांनी दर खाली आला आहे. तर 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमचा भाव 5,017 रुपये आहे, तर कालचा भाव 5,075 रुपये होता, म्हणजेच 58 रुपयांनी दर कमी झाला आहे.

याशिवाय, 24 कॅरेट सोन्याचा 8 ग्रॅमचा भाव 40,136 रुपये आहे, तर काल हा भाव 40,600 रुपये होता. म्हणजे, किमती 464 रुपयांनी दर कमी झाला आहे.

चांदीच्या दरातही आणखी घसरण

दुसरीकडे, आजच्या चांदीच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर, आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे, आज एक ग्रॅम चांदीचा भाव 64 रुपये आहे, तर काल चांदीचा भाव 64.8 रुपये होता, म्हणजेच आजचा भाव चांदीच्या दरात 0.8 रुपयांची घट झाली आहे.

त्याचवेळी, एक किलो चांदीच्या पट्टीचा भाव आज 64,000 रुपये आहे, तर कालचा भाव 64,800 रुपये होता, म्हणजेच 800 रुपयांनी भाव खाली आला आहे. त्यामुळे जर तुम्ही आज चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT