GoFirst Airways Dainik Gomantak
अर्थविश्व

GoFirst पुन्हा झेपावणार! 425 कोटींचे रुपयांचे अंतरिम कर्ज मंजूर; मात्र, सर्वांच्या नजरा 'या' निर्णयाकडे

GoFirst: सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक या विमान कंपनीला कर्ज देणारे कन्सोर्टियम आहेत.

Ashutosh Masgaunde

GoFirst Airlines News: अर्थिक अडचणीत असलेल्या GoFirst एअरलाइन्सच्या कर्ज पुरवठादारांनी एअरलाइनला पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने 425 कोटी रुपयांचे अंतरिम कर्ज मंजूर केले आहे.

अंतरिम कर्जासाठी तत्वतः मान्यता देण्यात आली असली तरी, कर्ज पुरवायचे की नाही हे पूर्णपणे संबंधित बँकांच्या व्यवस्थापन मंडळाच्या हाती असणार आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक या विमान कंपनीला कर्ज देणारे कन्सोर्टियम आहेत. अंतरिम कर्ज मंजूर करण्यासाठी ते बोर्डाची मंजुरी घेतील. त्यानंतर विमान कंपनीचे कामकाज सुरू करण्यासाठी DGCA ची मंजुरी घेतली जाईल.

गो फर्स्टच्या शैलेंद्र अजमेरा यांनी एअरलाइन्स फायनान्सर्सकडून 425 कोटी रुपयांची अंतरिम कर्जाची मागणी केली होती. ज्यामुळे गो फर्स्टची विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात मदत होईल.

विमानासाठी कार्यरत इंजिनची उपलब्धता आणि तिकीट रद्द करणे यासारख्या विशिष्ट परिस्थितींच्या आधारे कर्जाची आवश्यकता वाढू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीत गो फर्स्टच्या कर्ज पुरवठादारांच्या समितीसमोर कर्जाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

कर्जदारांच्या समितीमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक आणि ड्यूश बँक यांचा समावेश आहे. गो फर्स्ट जुलैमध्ये पुन्हा ऑपरेशन सुरू करण्याची आणि 22 विमानांसह 78 रोजची उड्डाणे चालवण्याची योजना आखत आहे.

गो फर्स्ट दिवाळखोरी फायलींगमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, आयडीबीआय बँक आणि ड्यूश बँक यांच्या कर्जदारांची यादी आहे, ज्यांचे एकूण 6,521 कोटी रुपये थकित आहेत.

मेच्या सुरुवातीला, गो फर्स्टने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल केला आणि वाढत्या तोट्यामुळे, प्रामुख्याने प्रॅट आणि व्हिटनीच्या इंजिनच्या वितरणात झालेल्या विलंबामुळे, त्याच्या फ्लीटचा काही भाग ग्राउंडिंग झाल्यामुळे, त्याचे फ्लाइट ऑपरेशन स्थगित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT