Petrol Diesel Prices  Dainik Gomantak
अर्थविश्व

लोकसभा निवडणुकीपूर्वी इंंधनाचे दर कमी होणार का? जाणून घ्या केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी काय म्हणाले

लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची शक्यता सरकारने फेटाळून लावली आहे.

Pramod Yadav

Goa Petrol-Diesel Price: लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची शक्यता सरकारने फेटाळून लावली आहे.

भारत हा जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहे. तसेच ऊर्जेची गरजही वाढली आहे, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

जगभरात विकसित आणि शेजारील देशांमध्येही इंधनाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. पण भारतात इंधनाच्या किमती स्थिर राहिल्या आहेत.

'दक्षिण आशियाई देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 40 ते 80 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाश्चात्य देशांवर नजर टाकली तर तिथेही किमती वाढल्या आहेत. मात्र भारतातील भाव आधीच खाली आले आहेत, असे पुरी म्हणाले.

‘दुसरीकडे, भारत हा जगातील एकमेव देश होता जिथे प्रत्यक्षात दोनदा नोव्हेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये किमती कमी केल्या गेल्या.

सध्या भारत हा जगातील ऊर्जा, तेल आणि एलपीजीचा तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. एलएनजी आयातदार, रिफायनर आणि ऑटोमोबाईल मार्केटमध्ये भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा देश बनला आहे. म्हणजे भारतातील ऊर्जेची गरज खूप जास्त आहे, असे मंंत्री म्हणाले.

'जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीतील प्रचंड अस्थिरता पाहता सरकारला इंधनाच्या किमतीत कोणतीही कपात करणे कठीण आहे आणि त्यामुळे सध्या OMC सोबत किंमत कपातीबाबत कोणतीही चर्चा नाही,' असे पुरी यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT