Ration shop Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Ration Scheme: मोफत राशनच्या नियमात मोठा बदल, करोडो कार्डधारकांना मिळणार नाही 'राशन'!

Government Scheme Latest News: अनेक राज्यांमध्ये मोफत राशन योजनेअंतर्गत गहू न देण्याचे सांगण्यात आले आहे, याचा अर्थ आता तुम्हाला मोफत राशन योजनेअंतर्गत गहू मिळणे थोडे कठीण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Free Ration Rules Changed: राशन नियम वेळोवेळी बदलले आहेत. (Free Ration Rules ) तुम्हीही मोफत राशनच्या सुविधेचा फायदा घेत असाल तर आता त्यात मोठा बदल करण्यात आला आहे, ज्याचा फटका यूपी-दिल्लीसह अनेक राज्यांतील राशनकार्डधारकांना बसणार आहे. अनेक राज्यांमध्ये मोफत राशन योजनेअंतर्गत गहू न देण्याचे सांगण्यात आले आहे, याचा अर्थ आता तुम्हाला मोफत राशन योजनेअंतर्गत गहू मिळणे थोडे कठीण झाले आहे.

काय बदलले आहे?

सरकारने (Government) केलेल्या या बदलामागील मुख्य कारण म्हणजे गव्हाचा तुटवडा. कार्डधारकांना गव्हाऐवजी तांदूळ वितरित केले जातील, असे राज्य सरकारांनी सांगितले आहे. PMGKAY योजनेंतर्गत गव्हाच्या जागी तांदूळ वितरित केला जाईल.

हा निर्णय का घेतला गेला?

याशिवाय, अनेक राज्यांमध्ये राशनकार्डधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू दिला जाईल आणि त्या जागी तांदूळ वाटण्यात येईल. गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पात्र राशनकार्डधारकांना गहू आणि तांदूळ मोफत दिला जातो, मात्र देशात गव्हाचा तुटवडा असल्याने अनेक राज्य सरकारांनी हा निर्णय घेतला आहे.

कोणत्या राज्यातील लाभार्थ्यांना गहू मिळणार नाही?

उत्तर प्रदेश, केरळ आणि बिहार (Bihar) या राज्यातील राशनकार्डधारकांना गहू वितरित केला जाणार नाही. याशिवाय उत्तराखंड, गुजरात, झारखंड, दिल्ली, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील कार्डधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू मिळेल.

55 लाख मेट्रिक टन अधिक तांदूळ वितरित केले जाणार

या सर्व राज्यांतील कार्डधारकांना गव्हाऐवजी अधिक तांदूळ वितरित केला जाईल. याशिवाय इतर राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशात गव्हाची कमी खरेदी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर सुमारे 55 लाख मेट्रिक टन अधिक तांदूळ वितरित केले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपाल अखेर म्हापसा न्यायालयात शरण; कोलवाळ तुरुंगात रवानगी, 10 वर्षांच्या शिक्षेविरोधात 'सर्वोच्च'कडे दाद

Dogs Longest Journey: 8 महिने, 3 भाऊ अन् 4126 किलोमीटरचा थरार! प्रेमासाठी रानकुत्र्यांनी ओलांडल्या 5 देशांच्या बॉर्डर; रचला जागतिक रेकॉर्ड

Goa Shack Licenses: गोव्यात शॅक व्यावसायिकांना मोठा दिलासा! ऑक्टोबरपूर्वीच परवाने मिळण्याचे संकेत; 304 अर्जदार पात्र, जागांचे सीमांकन लवकरच

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

SCROLL FOR NEXT