Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

FM Nirmala Sitharaman: अर्थसंकल्पापूर्वी अर्थमंत्री घेणार हा मोठा निर्णय, सर्वसामान्यांचे बल्ले-बल्ले!

FM Nirmala Sitharaman Latest News: देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहे.

दैनिक गोमन्तक

FM Nirmala Sitharaman: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी अर्थसंकल्पाची जोरदार तयारी करत आहेत. देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकार अनेक योजना आखत आहे. या अर्थसंकल्पापूर्वी सरकारने कोणत्या प्रकारच्या सूचना घेण्यास सुरुवात केली आहे, ते जाणून घेऊया...

अर्थसंकल्पावर चर्चा होईल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) शुक्रवारी राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा होऊन सूचनाही घेतल्या जाणार आहेत.

1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार

ही बैठक सरकारकडून पूर्व सूचनांसाठी बोलावली जात आहे, ज्याच्या आधारे पुढील वर्षाचा अर्थसंकल्प म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. यावेळीही सरकार 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे.

25 रोजी राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक होणार

उद्या म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी निर्मला सीतारामन राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत अर्थसंकल्पपूर्व बैठक घेणार आहेत. सोमवारीही सीतारामन यांनी अर्थसंकल्पासंदर्भात उद्योग प्रमुख, पायाभूत सुविधा आणि हवामान बदल तज्ञांची बैठक घेतली.

मंगळवारची बैठक ऑनलाइन असेल

यासोबतच कृषी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी अर्थमंत्री मंगळवारी कृषी प्रक्रिया उद्योग, वित्तीय आणि भांडवली बाजार क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत 'ऑनलाइन' बैठक घेतली. 24 नोव्हेंबर रोजी म्हणजेच, आज सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक संस्थांव्यतिरिक्त शिक्षण (Education), आरोग्य, पाणी आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांची बैठक होणार आहे.

सीतारामन यांचा पाचवा अर्थसंकल्प

2024 मध्ये एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी अर्थमंत्री सीतारामन यांचा हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. महागाईच्या (Inflation) समस्येवर मात करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी सरकार अनेक नवीन निर्णय घेऊ शकते. यासोबतच अर्थव्यवस्थेत 8 टक्क्यांहून अधिक आर्थिक वाढ होण्याची शक्यता असून त्यासाठी विशेष पावले उचलली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT