New Flying Electric Car Dainik Gomantak
अर्थविश्व

हवेत उडणारी कार, लवकरच होणार लॉन्च, टीझर आऊट

जगातील प्रिमियम लक्झरी कार निर्मात्या कंपनीने आपल्या नवीन आगामी कारचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील प्रिमियम लक्झरी कार निर्मात्या कंपनीने आपल्या नवीन आगामी कारचा टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये कार हवेत फायटर जेटप्रमाणे उडताना दिसून येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की लवकरच 24 ऑगस्ट रोजी ही आलिशान कार लॉन्च करण्यात येणार आहे. (Flying car soon to be launched teaser out)

कंपनीचा दावा आहे की ही एक वेगळ्या प्रकारची कार असेल. पण तुम्हाला माहित आहे का की ही कोणती कार आहे आणि कोणती कंपनी ही कार लॉन्च करणार आहे?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ही कार कंपनी दुसरी कोणीती नसून मर्सिडीज (Mercedes) आहे. मर्सिडीज आपली नवीन इलेक्ट्रिक कार Benz EQS 24 ऑगस्ट रोजी बाजारात आणणार आहे तर आता ही कार हवेत उडण्याची गोष्ट आहे, त्यामुळे या कारचा टीझर कंपनीने अशाच पद्धतीने लाँच केला आहे.

कंपनीने टीझरमध्ये दाखवले आहे की ही कार हवेत तरंगताना दिसून येत आहे. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ही कार इलेक्ट्रिक कार असणार आहे. मर्सिडीजचे म्हणणे आहे की इलेक्ट्रिक कारच्या जगात लॉन्च होणारी ही एका वेगळ्या युगाची कार आहे, जी सध्याच्या काळात इतर इलेक्ट्रिक कारच्या पुढे असणार आहे.

मर्सिडीज बेंझ इलेक्ट्रिकची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या

मर्सिडीजची इलेक्ट्रिक कार EQS 24 ऑगस्ट रोजी लॉन्च होईल

ही मर्सिडीज एस-क्लास आधारित इलेक्ट्रिक सेडान असणार आहे.

या इलेक्ट्रिक कारमध्ये एस-क्लास सेडानसारखीच वैशिष्ट्ये असणार आहेत.

मर्सिडीज ही कार दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये विकणार आहे.

एक प्रकार आहे EQS 450+ आणि दुसरा EQS 580 4MATIC असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vehicle Theft Case: मायणा कुडतरी पोलिसांची मोठी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या; 5 दुचाकीही जप्त

ऑफिसरसाहेब गोत्यात! नवरा रुममध्ये गर्लफ्रेंडसोबत असताना अचानक बायकोची एन्ट्री, रंगला हाय-व्होल्टेज ड्रामा Watch Video

पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर करुन मुस्लिम वृद्धाशी लावलं लग्न; कोर्टानं दिला 'हा' निर्णय

Viral Video: सायकलचं चाक लावून बाईकला जोडला पलंग, पठ्ठ्यानं झोपून चालवली गाडी; बिहारी तरुणाचा जुगाड तूफान व्हायरल

Viral Post: 'ब्रेकअप झालंय, कामात मन लागत नाही!' सुट्टीसाठी कर्मचाऱ्यानं केलेला मेल व्हायरल, पठ्ठ्याला मिळाली 10 दिवसांची सुट्टी

SCROLL FOR NEXT