Flipkart  Dainik Gomantak
अर्थविश्व

Flipkart वर खरेदी करत आहात तर, आधी ही बातमी नक्की वाचा

तुम्हाला Flipkart आणि Amazon या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आकर्षक सूट मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

नवीन स्मार्टफोन किंवा टीव्ही किंवा इतर काहीही खरेदी करायचे असेल तर, प्रत्येकाला बजेटमध्ये असेल अशी डील हवी असते. सध्या सेलचा हंगाम सुरू झाला आहे. तुम्हाला Flipkart आणि Amazon या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आकर्षक सूट मिळत आहे. समजा तुम्हाला या सेलमध्ये एखादे प्रोडक्ट घ्यायचे आहे, पण तुम्हाला त्या सर्वात स्वस्त प्रोडक्ट डील मिळत आहे हे कसे कळेल?

यासाठी आम्हाला एक सोपी ट्रिक मिळाली आहे. त्याच्या मदतीने, तुमच्या विश लिस्टमध्ये समाविष्ट असलेली प्रोडक्ट किती किंमतीला येत आहेत हे तुम्ही तपासू शकता. यासाठी तुम्हाला क्रोम एक्स्टेंशन डाउनलोड करावे लागेल.

एक्यटेंशन कसा वापर करावा?

प्राइस ट्रॅकर (Price Tracker) असे या एक्यटेंशनचे नाव असून कोणीही ते डाउनलोड करू शकतो. सर्व Chrome वापरकर्ते हा एक्यटेंशन डाउनलोड आणि वापरू शकतात. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या पीसी (PC) वर Chrome ब्राउझरवर जावे लागेल. यानंतर तुम्हाला प्राइस ट्रॅकर एक्स्टेंशन डाउनलोड करावे लागेल. तुम्ही ते Google Chrome वेब स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आता तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये एक्स्टेंशन इनेबल करावा लागेल.

येथून तुम्हाला फ्लिपकार्ट उघडावे लागेल आणि लॉगिन करावे लागेल. यावर तुम्हाला एखादे प्रोडक्ट शोधावे लागेल, जे तुम्हाला खरेदी करायचे आहे. तुम्हाला दोन उत्पादन पर्याय दिसतील. प्राइस डॉप अलर्ट आणि प्राइस हिस्ट्री ग्राफ दिसेल.

फायदे काय आहेत?

ग्राफच्या साहाय्याने हे उत्पादन यापूर्वी यापेक्षा कमी किमतीत आले होते का ते तुम्ही तपासू शकता. त्याच वेळी, किंमत कमी होण्याचा इशारा त्याच्या नावानुसार कार्य करेल. या मदतीने, तुमच्या आवडीचे प्रोडक्ट कमी किमतीत उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळतील. हा एक्स्टेंशन फक्त फ्लिपकार्टवर कार्य करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT