FM Nirmala Sitharaman Dainik Gomantak
अर्थविश्व

Budget 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्थसंकल्पावर निर्णय, अर्थ मंत्रालय सुरु करणार 'हे' काम

Budget: देशात दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नवीन आर्थिक वर्षातील देशाचे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देण्यात येतो.

Manish Jadhav

Budget: देशात दरवर्षी अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नवीन आर्थिक वर्षातील देशाचे उत्पन्न आणि खर्चाचा तपशील देण्यात येतो. यासोबतच यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

खरे तर, देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांपूर्वी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल आणि लोकसभा निवडणुकीनंतर देशात संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल.

आता अर्थ मंत्रालयाने अर्थसंकल्पासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्याअंतर्गत बैठकांची फेरी सुरु करण्यात येणार आहे.

बजेट बैठका

दरम्यान, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या (Budget) तयारीच्या संदर्भात अर्थ मंत्रालय 10 ऑक्टोबरपासून बैठकांची मालिका सुरु करणार आहे. याबाबत नोटीसही बजावण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या बजट विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, "अनुदान/विनियोजन संदर्भात सुधारित अंदाज 2023-24 आणि अंदाजपत्रक 2024-25 ला अंतिम रुप देण्यासाठी वित्त सचिव आणि सचिव (व्यय) यांच्यात पूर्व-अर्थसंकल्पीय चर्चा." यांच्या अध्यक्षतेखाली 10 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

नोटीस पाठवली आहे

दुसरीकडे, 20 सप्टेंबर 2023 रोजी सर्व मंत्रालये आणि विभागांना पाठवलेल्या या नोटीसमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांचा उल्लेख करण्यात आला आहे. विविध गरजा लक्षात घेऊन अर्थसंकल्पपूर्व बैठकांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.

नोटीसनुसार, मंत्रालये आणि विभागांनी 5 ऑक्टोबर 2023 पर्यंत आवश्यक तपशील सादर केल्याची खात्री करावी.

या तारखेपर्यंत बैठका सुरु राहणार आहेत

नियोजित वेळापत्रकानुसार 10 ऑक्टोबरपासून अर्थसंकल्पपूर्व बैठका सुरु होतील. त्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत या बैठका सुरु राहणार आहेत.

पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होणारा अर्थसंकल्प अंतरिम असेल. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील नवीन सरकारच्या (Government) शपथविधीनंतर 2024-25 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

Mhadei River Dispute: म्हादईप्रश्नी राहुल गांधींचे मौन! गोव्याच्या हिताला डावलून कर्नाटकाची पाठराखण केल्याचा गोमंतकीयांचा आरोप; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

SCROLL FOR NEXT