Union Minister For Cooperation Amit Shah Dainik Gomantak
अर्थविश्व

Farmers Income: शेतकऱ्यांचे बल्ले-बले, आता उत्पन्न होणार दुप्पट; अमित शहांची मोठी घोषणा

Farmers Income In India: देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक गोमन्तक

Farmer's Income Double: देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक विशेष प्रयत्न केले जात आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत आहे, मात्र आता शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी सरकारने आणखी एक विशेष योजना आणली आहे.

सरकार दुग्धजन्य पदार्थांना प्रोत्साहन देईल

देशातील सर्वात मोठी दूध विक्रेता कंपनी असणाऱ्या अमूलच्या सहकार्याने एक विशेष योजना बनवत आहे. आत्तापर्यंत अमूलचे दूध भारतात मोठ्याप्रमाणात वापरले जात आहे, मात्र आता इतर देशांतील नागरिकांनाही त्याचा आस्वाद घेता येणार आहे. सरकारच्या वतीने दुग्धजन्य पदार्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विशेष नियोजन करत आहे.

अमित शहा यांनी माहिती दिली

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, अमूलमध्ये पाच इतर सहकारी संस्थांचे विलीनीकरण केले जाईल, ज्यामुळे एक मोठी मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी (MSCS) तयार होईल. त्याच्या विलीनीकरणाची प्रक्रियाही सुरु झाली आहे. त्याचे निकाल लवकरच आपल्या सर्वांसमोर येतील, अशी सरकारला आशा आहे.

डिजिटल शेतीचे नियोजन

पीएम मोदींची योजना अशी आहे की, डिजिटल फार्मिंगद्वारे नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन दिले जाईल. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या (Farmers) उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे.

अशा प्रकारे ते परदेशात विकले जाईल

सध्या अमूलची उत्पादने गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने विकली जात आहेत. या महासंघात अनेक सहकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन होणार आहे. यानंतर अमूल आपली उत्पादने देशाबरोबरच परदेशातही विकू शकणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होणार?

अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताव्यतिरिक्त (India) शेजारील देशांमध्ये दुधाची मागणी वाढवायची असेल तर पुढील 5 वर्षांत उत्पादन दुप्पट करावे लागेल. यासोबतच दुधाची इतर देशांमध्ये निर्यात करण्याचेही नियोजन सुरु आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे.

नफा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल

अमित शाह शेवटी म्हणाले की, 'एमएससीएसच्या स्थापनेनंतर अमूलचे दूध नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि बांगलादेश या शेजारील देशांमध्येही निर्यात केले जाऊ शकते. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्याचा नफा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT