Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Update: तारीख ठरली! तुमच्या खात्यात येणार 81,000 रुपये

EPF Balance Check: पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

Employees Provident Fund: पीएफ खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या म्हणजेच EPFO ​​च्या 7 कोटी ग्राहकांना या महिन्याच्या अखेरीस आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकार आर्थिक वर्ष 2022 चे व्याज EPF खातेधारकांच्या खात्यात हस्तांतरित करणार आहे. यावेळी 8.1 टक्के दराने व्याज मिळेल. या महिन्याच्या अखेरीस व्याजाचे पैसे खात्यात ट्रान्सफर करता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वर्षीचे व्याज 40 वर्षांतील नीचांकी पातळीवर आहे.

व्याज कसे मोजायचे

जर तुमच्या पीएफ (PF) खात्यात 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला 81,000 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 7 लाख रुपये असल्यास तुम्हाला 56,700 रुपये व्याज मिळेल.

तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख रुपये असल्यास 40,500 रुपये व्याज म्हणून येतील.

तुमच्या खात्यात एक लाख रुपये असतील तर 8,100 रुपये येतील.

मिस्ड कॉल द्यावा

पीएफचे पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, तुम्हाला EPFO ​​च्या मेसेजद्वारे पीएफची माहिती मिळेल. इथे तुमचा UAN, PAN आणि आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे.

2. याप्रमाणे ऑनलाइन बॅलन्स चेक करा

1. ऑनलाइन बॅलन्स चेक करण्यासाठी, EPFO ​​वेबसाइटवर लॉग इन करा, epfindia.gov.in वर ई-पासबुकवर क्लिक करा.

2. आता तुमच्या ई-पासबुकवर क्लिक केल्यावर passbook.epfindia.gov.in वर एक नवीन पेज येईल.

3. आता इथे तुम्ही तुमचे युजरनेम (UAN नंबर), पासवर्ड टाका.

4. सर्व तपशील भरल्यानंतर, तुम्ही एका नव्या पेजवर याल आणि येथे तुम्हाला मेंबर आयडी निवडावा लागेल.

5. इथे तुम्हाला ईपीएफ बॅलन्स ई-पासबुकवर मिळेल.

3. UMANG App

1. यासाठी, तुम्ही तुमचे UMANG App (युनिफाइड मोबाइल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स) खोला आणि EPFO ​​वर क्लिक करा.

2. आता दुसऱ्या पेजवर, कर्मचारी-केंद्रित सेवांवर क्लिक करा.

3. इथे तुम्ही 'View Passbook' वर क्लिक करा. यासह, तुम्ही तुमचा UAN क्रमांक आणि पासवर्ड (OTP) क्रमांक भरा.

4. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल. यानंतर तुम्ही तुमचा पीएफ बॅलन्स चेक करु शकता.

4. SMS द्वारे बॅलन्स चेक करा

- जर तुमचा UAN नंबर EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुम्ही तुमच्या PF बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे मिळवू शकता.

यासाठी तुम्हाला EPFOHO ला 7738299899 वर पाठवावे लागेल.

जर तुम्हाला हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर तुम्हाला ती EPFOHO UAN लिहून पाठवावी लागेल.

- पीएफ बॅलन्स जाणून घेण्याची ही सेवा इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगालीमध्ये उपलब्ध आहे.

पीएफ बॅलन्ससाठी, तुमचा UAN, बँक खाते, PAN आणि आधार (AADHAR) लिंक असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

SCROLL FOR NEXT