Epfo Dainik Gomantak
अर्थविश्व

EPFO Interest Rates: PF च्या व्याजदरात होणार बंपर वाढ! केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

EPFO Interest Rates Hike: पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी.

दैनिक गोमन्तक

EPFO Interest Rates Hike: पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी. पीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याबाबत सरकारने मोठे वक्तव्य केले आहे. कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी 2021-2022 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदरातील बदलाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

सरकारने दिलेली माहिती

वास्तविक, हा प्रश्न रामेश्वर तेली यांना विचारण्यात आला होता की, सरकार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या ठेवींवर व्याजदर वाढवण्याबाबत पुनर्विचार करत आहे का? त्यावर लेखी उत्तर देताना त्यांनी व्याजदराचा फेरविचार करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. म्हणजेच, पीएफ (PF) खात्यावरील व्याजदरात कोणतीही वाढ होणार नाही.

लहान बचत योजनांपेक्षा जास्त व्याज

कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यापूर्वी सांगितले होते की, 'EPF चा व्याजदर हा सामान्य भविष्य निर्वाह निधी (7.10 टक्के), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (7.40 टक्के) आणि सुकन्या समृद्धी खाते योजना (7.60 टक्के) यासारख्या तुलनात्मक योजनांपेक्षा जास्त आहे.' म्हणजेच, रामेश्वर तेली यांच्या मते, लहान बचत योजनांमधून पीएफवर मिळणारे व्याज अजूनही जास्त आहे, अशा परिस्थितीत सरकार व्याजदर वाढीचा विचार करणार नाही. EPF वर 8.10 टक्के व्याज देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्री म्हणाले

रामेश्वर तेली यांनी नमूद केले की, पीएफवरील व्याजदर हा ईपीएफला (EPF) त्याच्या गुंतवणुकीतून मिळालेल्या उत्पन्नावर अवलंबून असतो आणि असे उत्पन्न केवळ ईपीएफ योजना, 1952 नुसार वितरित केले जाते.

रामेश्वर तेली यांनी पुढे असेही सांगितले की, सीबीटी आणि ईपीएफ 2021-22 साठी , 8.10 टक्के व्याजदराची शिफारस करण्यात आली होती, ज्याला सरकारने (Government) मान्यता दिली आहे. म्हणजेच, यावेळी PF वर 8.10 दराने व्याज मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT