Airtel Deal  Dainik Gomantak
अर्थविश्व

Airtel Deal:भारतात एलोन मस्कच्या स्टारलिंकला एअरटेलची टक्कर

भारती एयरटेलने (Airtel) भारतात उपगराद्वारे ब्रॉडबॅड सेवा देण्यासाठी एक महत्वाचा करार केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारती एयरटेलने (Airtel) भारतात उपगराद्वारे ब्रॉडबॅड सेवा देण्यासाठी एक महत्वाचा करार केला आहे. भारती समूहद्वारा सामर्थीत वनवेब आणि सॅटेलाइट (Satellite) सेवा प्रदाता ह्यूजेस नेटवर्क सिस्टम यांच्यात हा करार झाला. याअंतर्गत भारतात (India) सॅटेलाइट ब्रॉडबॅड सेवा देण्यासाठी सहा वर्षांच्या धोरणात्मक वितरण करार करण्यात आला आहे. ह्यूजेस कम्युनिकेशन इंडिया प्रा. लीमिटेड आणि भारती एयरतटेल यांच्यातील संयुक्त उपक्रम, भारतात सेवा प्रदान करेल असे अधिकृत निवेदनात सांगितले आहे.

एचसीआईपीएल चे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले, "वनवेबची क्षमता वापरुन, आम्ही एचसीआईपीएलद्वारे हाय-स्पीड कार्यक्षम सेवा आणण्यासाठी उत्सुक आहोत." वनवेबने (Oneweb) 27 डिसेंबर रोजी आणखी एक उपग्रह प्रक्षेपित करून आली क्षमता वाढवली आहे.

* स्टारलिंकची स्थिती

जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश एलोन मस्क (Elon Musk) यांची मूळ कंपनी स्टारलिंकही भारतात प्रवेश करणार आहे.त्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी, भारत सरकारने स्टारलिंक इंटरनेट (Internet) सेवाबाबत एक सल्लागार जारी केला होता. सरकारने म्हटले आहे होते की, स्टारलिंककडे भारतामध्ये उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा पुरविण्याचा परवाना नाही. यासोबतच सरकारने लोकांना एलोन मस्कच्या पाठीशी असलेलल्या कंपनीने प्रमोट केलेली सेवान घेण्याचा सल्ला दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT