Vijay Mallya Dainik Gomantak
अर्थविश्व

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला ईडीचा झटका

एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांना त्यांच्या खात्यात 5824.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून ही रक्कम यूबीएलच्या समभागांची विक्री करुन करण्यात आली आहे

दैनिक गोमन्तक

अनेक बँकांचे पैसे बुडवून परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. ईडीने असे सांगितले आहे की विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या एसबीआयच्या (State Bank of India) नेतृत्वातील बँकांच्या कन्सोर्टियमला ​​5,824.5 कोटी रुपये दिले गेलेआहेत .

याबद्दल केंद्रीय तपास यंत्रणेनं माहिती देताना सांगितले आहे की ही रक्कम अँटी मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत यूनाइटेड ब्रेव्हरीज लिमिटेडचे जप्त असणारे शेअर विकून मिळाली आहे.23 जून रोजी या शेअर्सची विक्री झाली होती, जेव्हा ईडीने यूबीएलचे जवळपास 6,624 कोटी रुपयांचे शेअर्स एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांना हस्तांतरीत केले आहेत . विजय मल्ल्यावर अनेक बँकांचे एकूण 9000 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे.

या कारवाई बाबत अधीक माहिती देताना ईडीने सांगितले आहे की ,'आज एसबीआयच्या नेतृत्त्वात असलेल्या बँकांना त्यांच्या खात्यात 5824.5 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून ही रक्कम यूबीएलच्या समभागांची विक्री करुन करण्यात आली आहे. '

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT