GoFirst Airline Dainik Gomantak
अर्थविश्व

GoFirst Airline: 55 प्रवाशांना विमानतळावर सोडून विमानाने केले उड्डाण, DGCA ने...!

GoFirst Airline: बंगळूरु विमानतळावर सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. येथून दिल्लीला उड्डाण करणारे विमान एकाही प्रवाशांशिवाय दिल्लीत पोहोचले.

दैनिक गोमन्तक

GoFirst Airline: बंगळूरु विमानतळावर सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. येथून दिल्लीला उड्डाण करणारे विमान एकाही प्रवाशांशिवाय दिल्लीत पोहोचले. विमानातील प्रवाशांनी याबाबतची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर 55 प्रवाशांना सोडून विमान उडून गेल्याची माहिती मिळाली. मात्र, आता डीजीसीएने या प्रकरणी विमान कंपनीकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

दरम्यान, हे विमान गो फर्स्ट एव्हिएशन कंपनीचे होते. या विमानातील 55 प्रवासी विमानतळावर उड्डाणासाठी तयार होते, ते विमानात चढण्यासाठी शटल बसमध्ये थांबले. तर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) GoFirst Airline कडून या घटनेबाबत अहवाल मागवला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर 53 जणांना दुसऱ्या फ्लाइटमध्ये हलवण्यात आले. त्याचवेळी दोन प्रवाशांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

तसेच, या घटनेनंतर विमानात प्रवास करण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या काही प्रवाशांनी (Passengers) त्यांच्या सोशल मीडीयावर संपूर्ण घटनेची माहिती दिली. लोकांनी सांगितले की, आम्ही शटलमध्ये उपस्थित होतो, परंतु बंगळूरु ते दिल्लीच्या फ्लाइटमध्ये चढू शकला नाही. सोमवारी हे विमान प्रवाशांशिवाय बंगळूरुहून 6:40 वाजता निघाले.

दुसरीकडे, या घटनेनंतर GoFirst एअरलाइनने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तथापि, एका प्रवाशाने ट्विट केले की, 'बंगळूरुहून दिल्लीला जाणारे G8-116 विमान प्रवाशांना न घेताच उड्डाण केले. त्याचवेळी, बसमध्ये चढलेले 50 हून अधिक प्रवासी विमानतळावरच थांबले.

शिवाय, या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत डीजीसीएने अहवाल मागवला आहे. DGCA अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही GoFirst Airline कडून अहवाल मागवला आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT