Swati Maliwal ANI
अर्थविश्व

इंडियन बँकेत गरोदर महिलांच्या भरती नियमांबाबत DCW कठोर

दिल्ली महिला आयोगाने इंडियन बँकेच्या गर्भवती महिलांसाठीच्या नवीन भरती नियमांबाबत बँकेला नोटीस पाठवली

दैनिक गोमन्तक

इंडियन बँकेने 3 महिन्यांवरील गर्भवती महिलेला तात्पुरते कर्तव्यासाठी अयोग्य घोषित केले आहे. यापूर्वी, एसबीआयनेही असे निर्देश जारी केले होते ज्यात तीन किंवा त्याहून अधिक महिन्यांच्या गर्भवती महिलेला सेवेत सामील होण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. आता या प्रकरणी दिल्ली महिला आयोगाने इंडियन बँकेला नोटीस बजावून त्यांची भर्ती मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केली आहे. यासोबतच दिल्ली महिला आयोगानेही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. (Indian Bank)

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी इंडियन बँकेला नोटीस पाठवून गर्भवती महिलांच्या भरतीसाठी जारी केलेली नवीन मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केली आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की इंडियन बँकेच्या नवीन आदेशात तीन किंवा त्याहून अधिक महिन्यांच्या गर्भवतींना त्वरित नोकरी सुरू करण्यास मनाई आहे. दिल्ली महिला आयोगाच्या वतीने बँकेला 23 जूनपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.

RBI गव्हर्नरला लिहिलेले पत्र

इंडियन बँकेला दिलेल्या नोटीसमध्ये महिला आयोगाने इंडियन बँकेची कथित कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. DCW ने म्हटले आहे की बँकेची कथित कारवाई भेदभावपूर्ण आणि बेकायदेशीर आहे, कारण ती सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 अंतर्गत प्रदान केलेल्या मातृत्व लाभांच्या विरोधात आहे. इंडियन बँकेने महिलाविरोधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत त्यांना थांबवण्याची गरज आहे, असे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरबीआयच्या गव्हर्नरांना पत्र लिहून म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

SCROLL FOR NEXT