स्वतःचे घर खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते, ज्यासाठी तुम्हाला आयुष्यभराची कमाई द्यावी लागते. ज्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर अशा लोकांना गृहकर्ज घेणे भाग पडते. आज बाजारात अनेक प्रकारचे होम लोन उपलब्ध आहेत आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम लोन निवडू शकता. मात्र ईएमआय भरण्यास उशीर केल्यास मोठे नुकसान होऊ शकते.
तुम्ही तुमचा EMI भरण्यास सलग 3 महिने उशीर केल्यास, बँक तुम्हाला पेमेंटसाठी स्मरणपत्र पाठवण्यास प्रारंभ करू शकते, परंतु जेव्हा विलंब होतो तेव्हा समस्या सुरू होते. ईएमआयची परतफेड करण्यात 3 महिन्यांपेक्षा जास्त विलंब होणे ही मोठी चूक मानली जाते. अशा परिस्थितीत, कायदा-2002 अंतर्गत थकबाकीच्या वसुलीसाठी मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करू शकतो.
EMI मध्ये उशीर झाल्यास थकित रकमेवर दरमहा सुमारे 1% ते 2% दंड आकारला जातो. तसेच, किमान विहित रकमेची तरतूद आहे. तुम्ही मोठी चूक केल्यास, बँक तुमचे कर्ज NPA म्हणून घोषित करू शकते आणि पुनर्प्राप्तीची प्रक्रिया नंतर सुरू होईल. सहसा कर्ज NPA म्हणून घोषित करण्यापूर्वी बँकेतर्फे नोटीस पाठविली जाते.
एनपीए घोषित केलेल्या खात्यांमधून त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी बँका थर्ड पार्टी एजंट वापरतात. यामध्ये तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
क्रेडिट स्कोअरवर परिणाम
गृहकर्ज EMI ची अनियमित परतफेड क्रेडिट स्कोअरवर परिणाम करू शकते. कर्जदार वारंवार ईएमआय पेमेंटमध्ये चूक करत असल्यास, त्याचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो. बहुतेक बँका त्यांचे कर्ज व्याजदर नियमित अंतराने रीसेट करतात ज्यामध्ये ते चालू रेपो दर आणि कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित जोखीम प्रीमियमच्या आधारावर लागू व्याजदर रीसेट करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.