Crypto Market  Dainik Gomantak
अर्थविश्व

Crypto Market : अजब क्रिप्टोची गजब गोष्ट! क्रिप्टोने महिलेला आधी बनवले करोडपती, मग केले कंगाल

क्रिप्टोबाबत एक अनोखी घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिप्टो मार्केट सध्या स्थिर आहे. त्याची किंमतही आता खूप कमी झाली आहे. मात्र, येत्या काळात त्यात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. क्रिप्टोबाबत एक अनोखी घटना समोर आली आहे. एका क्रिप्टो फर्मने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या महिलेच्या खात्यात 100 ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 5,500 रुपये) ऐवजी 10.5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर (सुमारे 56 कोटी रुपये) पाठवले. हे पैसे परत करण्याऐवजी महिलेने घरी नेले. थेवामनोगरी मॅनिवेल या महिलेच्या खात्यात अचानक 56 कोटी रुपये आले.

पैसे crypto.com ने पाठवले होते हे कंपनीला सात महिने माहित नव्हते. तथापि, कंपनीला परतावा म्हणून केवळ 100 ऑस्ट्रेलियन डॉलर्स परत करायचे होते. पण, कंपनीने चुकून 56 कोटी रुपये पाठवले. कंपनीलाही त्याची सात महिने माहिती नव्हती.

हे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याची योजना मॅनिवेलने केली. तिने मेलबर्नमध्ये $1.35 चे घर विकत घेतले. तथापि, नंतर तिने त्याची मालकी मलेशियामध्ये राहणारी त्यांची बहीण थिलागावथी गंगादोरी यांच्याकडे हस्तांतरित केली. या खरेदीनंतर महिनाभरानंतर तिने तिची मुलगी रवीना विजानच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्सफर केले. मनी ट्रान्सफरमध्ये ही चूक गेल्या वर्षी 20 मे रोजी कंपनीच्या वतीने घडली होती. तर क्रिप्टोडॉटकॉमला 23 डिसेंबर 2021 रोजी करोडो रुपयांच्या या चुकीची माहिती मिळाली.

यानंतर कंपनीने मॅनिवेलवर कायदेशीर कारवाई केली. आता न्यायालयाचा निर्णय आला आहे. असे सांगण्यात आले आहे की ती मालमत्ता विकून कंपनीला $1.35 दशलक्ष परत करेल. याशिवाय न्यायालयाने महिलेला 27 हजार डॉलरचे व्याज देण्याचे आदेशही दिले आहेत. उर्वरित पैसेही महिलेला परत करावे लागतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT