International Flights Dainik Gomantak
अर्थविश्व

Covid-19: 2 वर्षानंतर नियमित आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू

देशातील कोरोंना विषाणुचा प्रादुर्भाव कमी झल्याने अनेक सेवा पूर्ववत सुरू झाल्या असून सरकारने जवळपास 2 वर्षानंतर पुनः नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना विषणूचा संसर्ग (Corona Virus) कमी झाल्यामुळे हळूहळू निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. देशातील अनेक सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने जवळपास दोन वर्षानंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमानसेवा (International Flights) आजपासून सुरू केल्या आहेत.

भारत सरकारने आजपासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे, कोरोना विषणूचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी DGCA ने मार्च 2020 रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केली होती. पण दोन देशांमध्ये एअर बबल कररांतर्गत विमानसेवा सुरू ठेवण्यात आली होती.

* देशात कोरोनाची चौथी लाट येणार नाही

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या सेंटर फॉर मॉडर्न रिसर्च इन व्हायरोलॉजीचे माजी संचालक आणि सुप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टी. जेकब जॉन यांनी देशात कोरोना विषाणूची तिसरी लाट संपली आहे असा दावा केला आहे. तसेच जोपर्यंत विषाणूचे अनपेक्षित स्वरूप समोर येत नाही तोपर्यंत देशात कोरोना विषाणूची चौथी लाट येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सुप्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ डॉ. टी. जेकब जॉन म्हणाले “जागतिक महामारीची तिसरी लाट संपली असून देशातील अनेक सेवा पूर्ववत येत आहे असे आता आत्मविश्वासाने म्हणता येईल. माझी वैयक्तिक अपेक्षा आणि मत असे आहे की आपण चार आठवड्यांपेक्षा जास्त काळ या विषाणूच्या टप्प्यात असणार नाही. भारतातील (India) सर्व राज्यांमध्ये असलेल्या ट्रेंडमुळं मला हा विश्वास वाटत आहे”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT