gas cylinder  Dainik Gomantak
अर्थविश्व

Paytm वरून गॅस सिलिंडर बुक केल्यास कंपनी देणार कॅशबॅक

Paytm वरून गॅस सिलिंडर बुक कसा करावा

दैनिक गोमन्तक

LPG गॅस सिलेंडर हा आज आपल्या स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग बनला आहे. एक वेळ अशी होती की गॅस एजन्सीमध्ये जाऊन सिलिंडर बुक करावा लागायचा आणि तेथून सिलिंडर पुन्हा भरायचा. आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. आता सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग केले जाते आणि सिलिंडर गॅस एजन्सी घरपोच देते.

आता पेटीएम आपल्या वापरकर्त्यांना गॅस सिलिंडर बुकिंगवर अनेक ऑफर देत आहे. यामध्ये मोफत गॅस बुकिंगपासून ते कॅशबॅकपर्यंतचा समावेश आहे. पेटीएम वापरकर्ते इंडेन, भारत गॅस आणि एचपी सारख्या देशातील जवळपास सर्व कंपन्यांचे सिलिंडर बुक करून ऑफरचा लाभ घेऊ शकतात.

मोफत बुकिंग

पेटीएमने आपल्या सर्व वापरकर्त्यांना मोफत गॅस सिलिंडर बुक करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. पेटीएमचे म्हणणे आहे की ग्राहक पेटीएमवरून कोणत्याही कंपनीचे गॅस सिलिंडर मोफत बुक करू शकतात. यासाठी पेटीएम वापरकर्त्याला फ्रीगास कूपन कोड वापरावा लागेल. याशिवाय, कंपनी नवीन पेटीएम वापरकर्त्यांना गॅस सिलेंडर बुकिंगवर कॅश बॅक देखील देत आहे.

पेटीएमच्या नवीन वापरकर्त्यांनी सिलेंडर बुक केल्यास त्यांना 30 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या कॅशबॅकचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोमो कोड “FIRSTCYLINDER” वापरावा लागेल. याशिवाय वापरकर्ते पेटीएम पोस्टपेड म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेटीएम नाऊ पे लेटर सेवेमध्ये नोंदणी करून पुढील महिन्यात सिलिंडर बुकिंगसाठी पैसे देऊ शकतात.

असे करा बुकींग

  • तुमचे पेटीएम अॅप उघडा.

  • त्यानंतर रिचार्ज आणि बिल पेमेंट सेगमेंटमध्ये बुक गॅस सिलेंडर टॅबवर क्लिक करा.

  • गॅस कंपनी निवडा.

  • तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा LPG आयडी किंवा ग्राहक क्रमांक एंटर करा.

  • पेमेंट करताना, पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग यापैकी एक निवडा.

  • कूपन कोड विभागात प्रोमो कोड 'FREEGAS' सबमीट करा.

  • अशा प्रकारे तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल आणि गॅस एजन्सी तुमच्या पत्त्यावर सिलिंडर पोहोचवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT