Commercial LPG Cylinder Price Updates Dainik Gomantak
अर्थविश्व

कमर्शियल एलपीजी सिलिंडर दरात 198 रुपयांनी कपात; तुमच्या शहरात दर किती झाला ते तपासा?

पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे.

दैनिक गोमन्तक

पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये मोठी कपात केली आहे. आता दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1 जुलैपासून 198 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. (Commercial LPG cylinder price reduced by Rs 198)

पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइलने देशातील चारही महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये कपात केली आहे. यासेबतच दिल्लीमध्ये सर्वाधिक कपात करण्यात आली आहे, तर सर्वात कमी किंमत कोलकातामध्ये कमी करण्यात आली. कंपन्यांनी घरगुती ग्राहकांना कोणताही दिलासा दिलेला नाही, त्यामुळे 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर त्याच किमतीत मिळणार आहे. 19 मे रोजी शेवटचा बदल करण्यात आला होता.(Commercial LPG Cylinder Price Updates)

इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार, इंडेनचा गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 198 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर कोलकात्यात 182 रुपयांनी स्वस्त झाला. त्याचप्रमाणे 19 किलोचा एलपीजी सिलिंडर मुंबईत 190.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चेन्नईमध्ये 187 रुपयांनी स्वस्त झाला.

एका महिन्यात 333 रुपयांनी स्वस्त

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली. यापूर्वी जूनमध्ये 19 किलोचा सिलेंडर 135 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. याचा अर्थ महिनाभरातच त्याच्या किमतीमध्यें 333 रुपयांनी कमी करण्यात आले. याउलट, गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती दोनदा वाढवण्यात आल्या आणि दिल्लीत त्याची किंमत 1,003 रुपयांवरती पोहोचली. त्यानंतर कंपन्यांनी 53.50 रुपयांनी यामध्ये वाढ केली होती. जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याने गॅसच्या किमती वाढवाव्या लागल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या शहरात व्यावसायिक सिलिंडरची किंमत किती आहेत,

आजच्या कपातीनंतर देशातील चारही महानगरांमधील इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल झाला आहे. दिल्लीत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 2,021 रुपयांवर पोहोचली, तर सिलेंडर 2,140 रुपयांना उपलब्ध होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत मुंबईत सर्वात कमी असणार आहे,

त्याची किंमत 1,981 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत 2,186 रुपये प्रति सिलेंडर असणार आहे. जर आपण घरगुती गॅस सिलिंडरबद्दल बोललो, तर दिल्लीमध्ये सध्या 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 1,003 रुपये आहे, तर मुंबईतही ती त्याच किमतीत मिळणार आहे. कोलकात्यात सर्वात महाग घरगुती सिलिंडर 1,029 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये त्याची किंमत प्रति सिलेंडर 1,019 रुपये एवढी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT