LPG Dainik Gomantak
अर्थविश्व

LPG Cylinder Price Hike: सणासुदीच्या काळात मोठा धक्का, कमर्शियल सिलिंडर एवढ्या रुपयांनी महागला!

Commercial LPG Cylinder Price Hike: ऑक्टोबर महिना सुरु होताच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

Manish Jadhav

Commercial LPG Cylinder Price Hike: ऑक्टोबर महिना सुरु होताच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आजपासून, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी (Commercial LPG Cylinder Price Hike) वाढ झाली आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जात आहे.

घरगुती गॅस सिलिंडरची स्थिती काय आहे?

अवघ्या महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. चार महानगरांमध्ये, 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे.

इतर महानगरांमध्ये किमती किती वाढल्या?

इतर महानगरांबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे. इथे कमर्शियल गॅस सिलिंडर आता 1,636.00 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 204 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत 1,482 रुपयांवरुन 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. तर चेन्नईमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरुन 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत घट झाली आहे

सप्टेंबर 2023 मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसेच कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 158 रुपये झाली होती. यानंतर राजधानी दिल्लीत त्याची किंमत 1,522 रुपयांवर पोहोचली होती. कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम असा होऊ शकतो की, हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाणे-पिणे महाग होऊ शकते, कारण फक्त कमर्शियल गॅस सिलिंडरचा वापर केला जातो.

सरकारने मोठा दिलासा दिला होता

30 ऑगस्ट रोजीच सरकारने 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांना महागाईपासून मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवरून 903 रुपयांवर आली आहे. इतर अनेक शहरांमध्ये सिलिंडरचे दर 200 रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय, उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध एलपीजी गॅस सबसिडी देखील 400 रुपये करण्यात आली आहे. या योजनेतर्गंत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 703 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT