Flipkart Danik Gomantak
अर्थविश्व

चीनच्या या मोठ्या कंपनीने Flipkart सोबत केली कोटींची गुंतवणूक

चीनी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट ने फ्लिपकार्टच्या सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांच्याकडून या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये भागभांडवल खरेदी केले

दैनिक गोमन्तक

चीनी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट (Tencent) ने फ्लिपकार्टच्या (Flipkart) सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांच्याकडून या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये भागभांडवल खरेदी केले आहे. Tencent च्या युरोपियन सब्सिडियरीसोबत हा करार 264 दशलक्ष डॉलर (सुमारे 2060 कोटी रुपये) मध्ये झाला आहे. अधिकृत कागदपत्रांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (Flipkart Tencent Deal)

बिन्नी बन्सल यांची हिस्सेदारी सुमारे 1.84 टक्क्यांवर आली

फ्लिपकार्टचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे आणि त्याचे कामकाज फक्त भारतापुरते मर्यादित आहे. Tencent Cloud Europe BV सोबत करार केल्यानंतर Flipkart मधील बिन्नी बन्सलची हिस्सेदारी जवळपास 1.84 टक्क्यांवर आली आहे.

Tencent चा Flipkart मधील 0.72 टक्के हिस्सा

हा करार 26 ऑक्टोबर 2021 रोजी पूर्ण झाला आणि चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सरकारी अधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आली. आता Tencent च्या सब्सिडियरीची Flipkart मधील भागीदारी 0.72 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, जे सुमारे 264 दशलक्ष डॉलर आहे. जुलै 2021 पर्यंत, या ई-कॉमर्स कंपनीचे मूल्य 37.6 अब्ज डॉलर होते.

सिंगापूरमध्ये फ्लिपकार्ट टेनसेंट करार

बन्सल आणि टेनसेंट यांच्यातील करार जुलैमध्ये वित्तपुरवठ्या नंतर झाला होता. त्या वित्तपुरवठा फेरीत 3.6 अब्ज डॉलर उभारल्यानंतर, फ्लिपकार्टचे मूल्य 37.6 अब्ज झाले होते. हा करार सिंगापूरमध्ये झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, फ्लिपकार्टने भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे की ती एक जबाबदार कंपनी आहे आणि हा करार 'प्रेस नोट 3' च्या कक्षेत येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT