Free Laptop Scheme Dainik Gomantak
अर्थविश्व

Free Laptop Scheme: मोठी बातमी! 5 लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप

Fact check: अलीकडे सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही एका लिंकद्वारे लॅपटॉपसाठी अर्ज करू शकता.

दैनिक गोमन्तक

केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये महिला, विद्यार्थी आणि अनेक गरीबांना अनेक प्रकारची मदत दिली जाते. याशिवाय अनेक राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपही दिले आहेत. अलीकडे सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही एका लिंकद्वारे लॅपटॉपसाठी अर्ज करू शकता. (Free Laptop Scheme News)

* पीआयबीने फॅक्ट चेक केली

पीआयबीला फॅक्ट चेकद्वारे या मॅसेजची सत्यता कळली आहे. पीआयबीने अधिकृत ट्विटवर या मॅसेजची सत्यताही सांगितली आहे.

* 5 लाखांचे लॅपटॉप देणार मोफत?
पीआयबीने अधिकृत ट्विटरवर (Twitter) लिहिले की, एका मजकूर संदेशातील एक लिंक व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की शिक्षण मंत्रालय 5,00,000 लॅपटॉप मोफत वितरीत करत आहे. हा लॅपटॉप (Laptop) सर्व विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

  • ही लिंक पूर्णपणे बनावट आहे.

  • केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही.

* फेक मॅसेजपासून सावध राहा

सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या अशा मॅसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे . पीआयबीने लोकांना असे मॅसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा मॅसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणता.

* व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करता येईल
जर तुमच्याकडेही असा मॅसेज आला तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT