DA Hike Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

DA DR Hike July 2026 Announcement: दिवाळी आणि दुर्गाोत्सवाच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली. महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Manish Jadhav

DA DR Hike July 2026 Announcement: दिवाळी आणि दुर्गाोत्सवाच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली. महागाई भत्ता आणि महागाई सवलत यामध्ये मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेने सरकारला पत्र लिहून ही वाढ आगामी सणासुदीच्या काळापूर्वीच घोषित करण्याची आग्रही मागणी केली. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर यंदाच्या सणांमध्ये लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या हातात बक्कळ पैसा आणि तीन महिन्यांचा एरियर येऊ शकतो.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 60 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, जो जानेवारी 2026 पासून लागू आहे. परंतु, 7व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार आणि गेल्या 12 महिन्यांच्या (जुलै 2025 ते जून 2026) महागाई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, हा भत्ता वाढून थेट 63 ते 64 टक्क्यांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजेच, कर्मचाऱ्यांच्या (Employees) डीएमध्ये तब्बल 3 ते 4 टक्क्यांची घसघशीत वाढ होऊ शकते.

या संभाव्य वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात किती मोठा फरक पडेल, याचे काही अंदाज खालीलप्रमाणे आहेत:

  • 50,000 रुपये मूळ वेतन: नवीन डीए अंदाजे 31,500 ते 32,000 रुपयांपर्यंत होईल, ज्यामुळे एकूण सॅलरी 81,500 ते 82,000 रुपयांच्या घरात जाईल.

  • 60,000 रुपये मूळ वेतन: नवीन डीए 37,800 ते 38,400 रुपयांपर्यंत पोहोचेल आणि एकूण वेतन सुमारे 97,800 ते 98,400 रुपये होईल.

  • 70,000 रुपये मूळ वेतन: नवीन डीए 44,100 ते 44,800 रुपयांच्या दरम्यान राहील, ज्यामुळे एकूण वेतन 1 लाख 14 हजार रुपयांच्या पुढे जाईल.

  • 80,000 रुपये मूळ वेतन: नवीन डीए 50,400 ते 51,200 रुपये होईल आणि एकूण वेतन 1 लाख 30 हजार रुपयांहून अधिक बनेल.

  • 1 लाख रुपये मूळ वेतन: नवीन डीए थेट 63,000 ते 64,000 रुपये होईल, ज्यामुळे एकूण टेक-होम सॅलरी 1 लाख 63 हजार ते 1 लाख 64 हजार रुपयांच्या पार निघेल.

विशेष म्हणजे, ही वाढ 1 जुलैपासून लागू मानली जाणार असल्यामुळे, जेव्हा कधी सरकार याची अधिकृत घोषणा करेल, तेव्हा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचा थकबाकी भत्ता कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दुर्गा पूजा आणि दिवाळी कर्मचाऱ्यांसाठी अधिकच आनंददायी ठरणार यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT