DA Hike 2026 Dainik Gomantak
अर्थविश्व

DA Hike 2026: ऑक्टोबर महिन्यात धमाका! नवरात्र-दिवाळीआधी 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठं गिफ्ट; महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा जॅकपॉट

Central Government Employees DA Hike 4 Percent: आगामी सणासुदीच्या काळात म्हणजेच नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर देशातील 50 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

Central Government Employees DA Hike 4 Percent: आगामी सणासुदीच्या काळात म्हणजेच नवरात्र आणि दिवाळीच्या तोंडावर देशातील 50 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार जुलैपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर 60 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच्या जुलैच्या ताज्या आकडेवारीनुसार, हा निर्देशांक 153.2 च्या स्तरावर पोहोचला आहे. या आकडेवारीचे गणित पाहता यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. ही 4 टक्क्यांची वाढ लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता वाढून थेट 64 टक्क्यांवर पोहोचणार आहे.

सरकार साधारणपणे जुलै महिन्यापासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर करते. त्यामुळे या सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना ही मोठी भेट मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर या निर्णयाची घोषणा होण्यास काही दिवसांचा विलंब झाला, तरीही हा वाढीव भत्ता 1 जुलै 2026 पासूनच प्रभावी मानला जाईल. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा थकबाकीचा हप्ता एकत्रितपणे दिला जाईल.

महागाई भत्त्यातील ही 4 टक्क्यांची वाढ मूळ वेतनावर आधारित असल्याने, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जितके जास्त असेल तितका त्यांचा प्रत्यक्ष आर्थिक फायदा अधिक होईल. या निर्णयामुळे केवळ इन-हँड पगारच वाढणार नाही, तर पेन्शनधारकांची मासिक पेन्शनही वाढेल. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीच्या योगदानावरही याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर मिळणाऱ्या या आर्थिक दिलाशामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT