Cement Price Hike  Dainik Gomantak
अर्थविश्व

सर्वसामान्यांना अजून एक झटका! सिमेंटचे दर भिडले गगनाला

या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत सिमेंटची किंमत 25 ते 50 रुपये प्रति पोती वाढू शकते.

दैनिक गोमन्तक

Cement Price Hike : जर तुम्ही घराची दुरुस्ती करण्याचा विचार करत असाल तर तुमचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे. तेल ते बिस्किटांच्या महागाईमुळे सर्वसामान्य आधीच पिचून गेली आहे. त्यात मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे घर. आता घर बांधणे खूप महाग होणार आहे. सिमेंट कंपन्या एप्रिलमध्ये आपल्या दरात मोठी वाढ करणार आहेत. माहितीनुसार, या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत सिमेंटची किंमत (Cement Market) 25 ते 50 रुपये प्रति पोती वाढू शकते.

उत्पादकांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे झालेली दरवाढ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 महिन्यांत सिमेंटची किंमत 390 रुपये प्रति पोतीपर्यंत वाढली आहे. उत्पादकांनी आता खर्च वाढल्याचा भार ग्राहकांवर टाकला आहे. यामुळे सिमेंट 25-50 रुपयांनी महाग होऊ शकते.

मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 115 डॉलर प्रति बॅरल होत्या. याशिवाय विविध कारणांमुळे आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमतीही वाढल्या आहेत. वीज आणि इंधनाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रस्तेमार्गे मालवाहतुकीचे शुल्कही वाढले आहे. क्रिसिल रिसर्चचे संचालक एच गांधी म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत सिमेंटची मागणी 20 टक्क्यांनी वाढली आहे. पण अवकाळी पाऊस, मजूर न मिळाल्याने दुसऱ्या सहामाहीचा वेग मंदावला.

“2022-23 या आर्थिक वर्षात सिमेंटचे प्रमाण 5 ते 7 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. मूलभूत पायाभूत सुविधा असलेल्या छोट्या शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांवर भर देणे हे त्याचे कारण आहे. मात्र, बांधकाम खर्चात वाढ झाल्याने मागणीत वाढ होण्यावर काही प्रमाणात अंकुश राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT