Car Insurance Dainik Gomantak
अर्थविश्व

कार विमा होणार महाग, वाचा सविस्तर

या वर्षी तुम्हाला कार विम्यासाठी (Car Insurance) जास्त पैसे (Money) मोजावे लागू शकतात.

दैनिक गोमन्तक

या वर्षी कार विमा (Car Insurance) महाग होण्याची शक्यता आहे. वाहनानांची विक्री कमी झाली असून गेल्या वर्षापासून लॉकडाउनसारख्या (Lockdown) परिस्थितिमुळे वाहने फारच कमी चालत असल्याने त्यांच्या कार विमा खर्चात घट झाली आहे. यामुळे आता कार विमा कंपन्या अधिक प्रीमियम आकरण्याची तयारी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, देशातील 25 सामान्य विमा कंपन्यांनी विमा नियामक IRDAकडे प्रसाव दिला आहे की कार विम्याच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सच्या (Insurance)प्रीमियममध्ये 15 ते 20 टक्के वाढ करावी. 15 ते 20 टक्के भाडेवाढीचा प्रसाव पूर्ण होऊ शकत नाही, असे मानले जाते कारण त्यामुळे सर्वसामान्य वाहन ग्राहकांना विमा करणे महाग होणार आहे.

* खर्च वाढण्याचे कारण

वाहनांची विक्री कमी झाल्यामुळे, विमा कंपन्यांच्या विमा टक्केवारीमध्ये घट झाली आहे. यात विमा काढणाऱ्या ग्राहकांची संख्याही वाढली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या आधारे कोरोनामुळे (Corona) वाहनांच्या विक्रीत घाट झाली आहे आणि याशिवाय, मोटार विमा कंपन्यांचा विकास दर देखील गेल्या वर्षी नकारात्मक होता.

आयआरडीएने यावर्षी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम वाढण्याचे संकेत दिले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.यासोबतच गेल्या वर्षभरात थर्ड पार्टी इन्शुरन्स क्लेममध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे कार इन्शुरन्स कंपन्या त्यांच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याची जोरदार मागणी करत आहेत.

व्यावसायिक वाहनांवर अधिक परिणाम

असा अंदाज व्यक्त केला जात आहे की प्रीमियम 5 ते 7 टक्क्यांच्या दरम्यान वाढू शकतो, परंतु व्यावसायिक वाहनांवर त्यांच्या वाढीची टक्केवारी 15-20 टक्क्यांच्या दरम्यान असू शकते. गेल्या दोन वर्षापासून कार विम्याचा हप्ता वाढलेला नाही ही बाब लक्षात घेऊन प्रीमियममध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: 'ओंकार' पोचला उगाडे - सिंधुदुर्गात... सीमोल्लंघन सुरूच; पेडणे वन कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

गोव्‍यात धार्मिक कलह माजवू पाहणाऱ्या संघटनांवर बंदी घाला! चर्चिल यांची मागणी; गौतम खट्टर विराेधात पोलिस तक्रार

गौतम खट्टरला 48 तासांत अटक करा! सासष्टीत वातावरण तप्त; आप, कॉंग्रेससह सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार

IPL Points Table: मुंबई इंडियन्सचं जबरदस्त 'कमबॅक'! गुजरातला धूळ चारुन गुणतालिकेत घेतली मोठी झेप; चेन्नईसह तीन संघांना फटका

SCROLL FOR NEXT