Car Shopping Dainik Gomantak
अर्थविश्व

Car Shopping: कार विकत घेताय? नवीन असो किंवा सेकंड हँड, 5 गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल मनस्ताप

तुम्ही देखील कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची घ्या काळजी.

दैनिक गोमन्तक

भारतीय ऑटोमोबाईल मार्केट जगातील चौथ्या क्रमांकावर आहे. या क्षेत्रात भारतीय आणि विदेशी अशी दोन्ही कंपन्या आहेत. यामुळे भारतीय लोकांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची जुनी कार विकायची असेल तर जुन्या कारची बाजारपेठ चांगली आहे. पण जर तुम्ही तुमची कार विकत घेत असाल तर तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. चला तर मग जाणुन घेउया की अशा कोणत्या गोष्टी की ज्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

  • तुमची गरज लक्षात घ्या

जर तुम्हाला स्वतःसाठी कार घ्यायची असेल, तर तुम्हाला कारची खरच गरज आहे का? याचा विचार करावा. सेकंड हँड कार घेण्यापूर्वी, कारची स्थिती कशी आहे ते पहा जेणेकरून ती घेतल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

  • तुमचे बजेट पाहुन करा खरेदी

तुम्हाला आता कार घ्यायची आहे असे एकदा ठरवले की मग तुमचे बजेटही ठरवा. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी बजेट ठरवावे जेणेकरुन नंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा की कारची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या 40% पेक्षा जास्त नसावी किंवा कारवरील EMI रक्कम तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 20% पेक्षा जास्त नसावी.

ऑर्फस नीट जाणुन घ्या

कार घेण्यापूर्वी डीलरकडून विविध ऑफर्सबद्दल सांगितले जाते. परंतु तुम्ही ते काळजीपूर्वक तपासले पाहिजे.जेणेकरून तुम्ही नंतर कोणत्याही फसवणुकीला बळी पडणार नाही. सर्वात पहिले विनामूल्य अॅक्सेसरीजच्या किमतींकडे लक्ष द्या, जे सहसा डीलरशिपद्वारे वाढवली जातात.

पेट्रोल किंवा डिझेल किंवा सीएनजी

देशात पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अनेक लोक सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यावर भर देत आहेत. म्हणून, कार खरेदी करण्यापूर्वी, पेट्रोल, सीएनजी किंवा डिझेल कार आपल्यासाठी सर्वोत्तम आहे की नाही हे एकदा तपासुन घ्यावे. तुमच्या सोयीनुसार तुम्हाला सूट होईल अशी कार खरेदी करावी.

  • कारचे कागदपत्रे तपासावे

जर तुम्ही स्वत:साठी सेकंड हँड कार घेण्याचा विचार करत असाल तर कारची संपुर्ण कागदपत्रे तुमच्याकडे आहेत याची नोंद घ्यावी, कारच्या कागदपत्रांशिवाय कोणताही व्यवहार करू नका. जेव्हा तुम्ही जुणी कार खरेदी कराल, तेव्हा एकदा कार पूर्ण तपासुन घ्यावी.यामुळे तुम्हाला कार घेतल्यावर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT